कोरोनाचे संकट त्यात, रेशनवर धान्यही मिळेना

रेशन दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना जून महिन्यात पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतील (पीएमजीकेवाय) मोफत तांदूळ आणि गहू मिळाला.
Ration Card
Ration CardSakal

पुणे - वेळेत धान्याची (Grain) उचल न झाल्यामुळे जून महिन्याचे (June Month) नियमित धान्य रेशन दुकानांपर्यंत (Ration Shop) पोचले नाही. त्यामुळे कोरोनासोबतच (Corona) आर्थिक संकटाशी (Economic Crisis) लढत असलेल्या अन्नसुरक्षा योजनेतील गरीब शिधापत्रिकाधारकांना (Ration Card) जून महिन्यात विकतच्या धान्यापासूनही वंचित राहण्याची वेळ आली आहे. (Poor Ration Card Holders do not Get Grain)

रेशन दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना जून महिन्यात पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतील (पीएमजीकेवाय) मोफत तांदूळ आणि गहू मिळाला. याव्यतिरिक्त प्राधान्य कुटुंब आणि अंत्योदय योजनेतील गहू आणि तांदूळ घेण्यासाठी रेशन दुकानदारांनी चलनाद्वारे पैसेही भरले. परंतु, ‘पीएमजीकेवाय’ योजनेतील मोफतचे धान्य उचलण्याच्या प्रक्रियेत नियमित धान्याची उचल करता आली नाही. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांना धान्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

मुदतवाढ देण्याची मागणी

‘पीएमजीकेवाय’ योजनेंतर्गत मे आणि जून महिन्यातील धान्य उचलण्यासाठी ३१ मेपर्यंत मुदत होती. ते उचलताना अन्नसुरक्षा योजनेतील धान्य उचलता आले नाही. शिधापत्रिकाधारक धान्यापासून वंचित राहू नयेत, यासाठी जून महिन्याचे धान्य उचलण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ मिळावी, अशी मागणी अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे यांनी भारतीय खाद्य महामंडळ आणि अन्न व नागरी पुरवठा विभाग यांच्याकडे केली आहे.

‘पीएमजीकेवाय’ योजनेतील मोफत गहू आणि तांदूळ उपलब्ध झाला. परंतु, दोन रुपये प्रतिकिलो गहू आणि तीन रुपये किलोचा नियमित गहू आणि तांदळाची ‘एफसीआय’कडून उचल झाली नाही. त्यामुळे रेशन दुकानदार आणि ग्राहकांमध्ये वाद होत आहेत. याबाबत स्थानिक खासदार आणि इतर लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केल्यास शिधापत्रिकाधारकांना धान्य उपलब्ध होऊ शकेल.

- गणेश डांगी, अध्यक्ष, रेशन दुकानदार संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com