देशभर भागडीची कीर्ती नेण्याचे काम करू- पोपटराव पवार

popatrao pawar speaks about bhagdi village work regarding water
popatrao pawar speaks about bhagdi village work regarding water

मंचर : आदर्शगाव भागडी (ता. आंबेगाव) गावाला दिवाळी नंतर पाण्याचा टँकर लागत होता. शेतीच्या पाण्याच्या समस्येमुळे अनेक कुटुंब रोजगारासाठी स्थलांतरित झाली होती. आदर्शगाव योजनेत समावेश झाल्यानंतर पाणलोट क्षेत्र विकासाची कामे पूर्ण झाल्यानंतर गाव पाणीदार झाले. अनेक शेतकरी शेती उत्पनातून लखपती झाले आहेत. गावकऱ्यांनी पाण्याच्या टँकरला कायम स्वरूपी निरोप दिला आहे. स्थलांतरित झालेली कुटुंब गावात परतली आहेत. पर्यावरण पूरक अनेक कामे गावात झाली आहेत. आदर्शगाव हिवरे बाजार व राळेगणसिद्धी प्रमाणे गाव बदलले आहे. देशभर भागडीची कीर्ती नेण्याचे काम करू.’’ अशी ग्वाही आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी दिली.

यशदा संस्थेची वार्षिक बैठक भागडी गावात झाली. त्यावेळी शिवार फेरी झाल्यानंतर पवार बोलत होते. यावेळी आंनदवनचे डॉ. विकास आमटे, यशदाचे महासंचालक आनंद लिमये, रामभाऊ म्हळगी प्रबोधीनीचे रवींद्र साठे, भारत भूषण, मिलिंद टाकसाळे, रविकांत गौतमे, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, तबाजी उंडे, अनिल उंडे, कुरवंडीचे सरपंच विशाल तोत्रे, रवींद्र तोत्रे, डी. के. भोर उपस्थित होते. उद्योजक किसनराव उंडे, प्रभाकर उंडे, पोपटराव थिटे, संदीप आदक यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. निशा जाधव, प्रियांका गावडे, राजू जाधव व बबनराव सानप यांनी गावातील बदलांची चित्रफीत सादर केली.   

पवार म्हणाले, “दिलीप वळसे पाटील यांनी सूचना केली होती कि, आंबेगाव तालुक्यातील एखादे गाव आदर्श करा. त्यानुसार ज्ञानशक्ती विकास वाहिनी स्वयसेवी संस्थेने येथे चांगले काम केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदर्शगाव योजनेला चांगले पाठबळ आहे. मागणी न करताही जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी आदर्शगाव योजनेसाठी दहा कोटी रुपये निधी देऊ असे सांगितले आहे. अनेक गावे पाणीदार होणार आहेत. गावकऱ्यांनी यापुढे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा. तुषार, ठिबक, मल्चिंग पेपरचा व सेंद्रिय खतांचा वापर वाढवावा.

आमटे म्हणाले, “भागडी गावाने चमत्कार केला आहे. गावकऱ्यांची मेहनत कौतुकास्पद आहे. उपेक्षितांना मदत करण्याचे काम अपेक्षित आहे.’’

लिमये म्हणाले, “नगर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी असताना आदर्शगाव योजनेची मुहूर्त मेढ रोवताना माझा सहभाग होता. भागडी गाव दुष्काळमुक्त झाल्याचे पाहून व परराज्यातील अनेक अधिकारी येथे भेट देत असल्याचे ऐकून समाधान वाटले.’’  अर्जुन बराटे, गोपाळ गवारी, रामदास गवारी यांच्या कलिंगड, टोमॅटो व डाळिंब पिकाची पाहणी केली. सरपंच वैभव उंडे, ज्ञानेश्वर उंडे यांची मनोगते झाली. रामदास आगळे यांनी आभार मानले. मनोहर थिटे यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com