पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पोफळे, जाधव, ढोरे विजयी

bjp_rashtravadi.jpg
bjp_rashtravadi.jpg

पुणे : महापालिकेच्या नव्या फुरसुंगी-लोहगाव (प्रभाग क्र.42) मधील निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि विरोधी पक्ष राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा मिळाली. या प्रभागातून राष्ट्रवादीचे गणेश ढोरे आणि भाजपच्या आश्‍विनी पोकळे निवडून आल्या. तर, धानोरी-कळस-विश्रांतवाडी (प्रभाग क्र.1) मधील पोटनिवडणुकीत भाजपच्या वृषाली जाधव विजयी झाल्या. 


या निवडणुकीत ढोरे यांना 26 हजार 304 मते मिळाली असून, शिवसेनेचे अमोल हरपळे यांना 20 हजार 224 मते मिळाले. त्यात ढोरे यांनी 6 हजार 8 मतांची आघाडी घेतली. पोकळे यांनी 24 हजार 851 मते घेत कामठे यांचा 932 मतांनी पराभव केला. कामठे यांना 23 हजार 919 मते मिळाली. 
धानोरी-कळस-विश्रांतवाडीतून जाधव यांना 7 हजार 100 मते मिळाली. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रेणुका चलवादी यांना 4 हजार मतांवर समाधान मानावे लागले. 

या प्रभागातील भाजपच्या किरण जठार यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याने त्यातील एका गटासाठी पोटनिवडणूक झाली. येथील वंचित बहुजन आघाडीच्या रेहिणी टेकाडे यांना 2 हजार 900 मते मिळाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com