सकारात्मक ऊर्जाच ठरणार महत्त्वाची 

World-Mental-Health-Day
World-Mental-Health-Day

पुणे - तुम्हाला सकारात्मक ऊर्जा (पॉझिटिव्ह एनर्जी) नेमकी कशातून मिळते, ते शोधा. कोणाला कामात गढून गेल्यानंतर सकारात्मक ऊर्जा मिळेल, तर काहींना योगासने, ध्यानधारणा, व्यायाम, चालण्यातून मिळू शकते. या आणि अशा कोणत्याही मार्गाने ही ऊर्जा मिळवा. कारण, मनाचा सकारात्मक दृष्टिकोन आणि कामात झोकून देण्यासाठी शारीरिक ऊर्जा भविष्यात महत्त्वाची ठरणार आहे. या दोन्ही गोष्टी सातत्याने टिकवून ठेवणे हे आताच्या काळातील आव्हान आहे. त्यामुळे तुम्हाला ज्यातून चांगलं वाटेल नियमित करा ते करा, असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञांनी दिला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दरवर्षी १० ऑक्‍टोबर हा जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. या वर्षी जगातील बहुतांश देशांना कोरोनाचा विळखा पडला आहे. त्याचा थेट परिणाम आरोग्य व्यवस्थेवर झालाच तसाच अर्थव्यवस्थेवरही झाला. त्यातून कर्मचाऱ्यांचे वेतन कपात झाली, उद्योग-धंद्यांना फटका बसला. कुटुंबाचे आर्थिक गणित चुकले. त्यामुळे मानसिक आरोग्य धोक्‍यात येत असल्याचे चित्र निर्माण होत आहे. या पार्श्‍वभूमीवर मानसोपचार तज्ज्ञांनी हा सल्ला दिला.

डॉ. संजय फडके म्हणाले, ‘यापूर्वी मानवावर कोसळलेल्या सर्व नैसर्गिक आपत्ती एका विशिष्ट कालावधीनंतर संपल्या. भूकंप काही सेकंदांमध्ये संपतो. त्याच्यानंतरचे भूकंपाच्या केंद्राजवळ तीव्रता सर्वाधिक असते. परंतु, तो सर्वव्यापी नसतात. त्यामुळे होणारे नुकसान हे त्याच ठराविक भागात असतं. मात्र, सध्याचा कोरोनाचा उद्रेक कधी थांबणार हे निश्‍चित माहिती नाही. या सगळ्यात खचून न जात स्वत-चं मनोबल टिकवून ठेवणं. सध्याच्या समस्या या आभासी नाहीत. याची दाहकता प्रत्यक्षात सगळेजण अनुभवत आहोत. त्यामुळे मन आणि शरीराचे आरोग्य चांगलं राहील, याची काळजी घ्या,’’ असेही त्यांनी स्पष्ट केले. 

‘‘मानसिक आरोग्याच्या समस्येमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. लॉकडाउन सुरू झाल्यापासून रुग्णांमध्ये ५० टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. मानसिक आजार असलेले बहुतेक रुग्ण ६० वर्षांपेक्षा कमी वयाचे असतात. ज्यामध्ये तरुण रुग्ण अधिक प्रभावित झाले आहेत. मानसिक आरोग्याच्या समस्येच्या व्याप्तीत बदल झाला आहे,’’ अशी माहिती कोलंबिया एशिया हॉस्पिटलच्या मानसोपचार सल्लागार डॉ. सायंतानी मुखर्जी यांनी दिली.

नागरिकहो हे करा

  • दिवसातील काही वेळ व्यायाम व योगासनांसाठी राखून ठेवा
  • झोपेच्या आधी संगीत ऐका
  • आवडती पुस्तक वाचा
  • सकाळी चालायला जा
  • झुंबा करा

परीक्षेबरोबरच करावी लागतेय मानसिक तयारी
पुण्यातील ९३ टक्के विद्यार्थ्यांना करिअरच्या चिंतेने ग्रासले आहे. परीक्षेच्या अभ्यासाबरोबरच त्याची मानसिक तयारी आता विद्यार्थ्यांना करावी लागत असल्याचा निष्कर्ष पुढे आला. परीक्षेबद्दलची अनिश्‍चितता दूर होऊन त्यांचा अंतिम निर्णय झाला. त्यानंतर परीक्षेचे स्वरूप, निश्‍चित अभ्यासक्रम आणि नेटवर्क अशा अनेक अडथळ्यांमधून मार्ग काढत विद्यार्थी अभ्यास करत आहेत. जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने केलेल्या पाहणीतून हा निष्कर्ष निघाला आहे. पुण्यातील वेगवेगळ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संपर्क साधून केलेल्या सर्वेक्षणात ६४ टक्के मुले आणि ३६ टक्के मुली सहभागी झाल्या. यातील ९० टक्के विद्यार्थी हे पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या शेवटच्या वर्षातील होते.

लॉकडाउनमध्ये रुग्णांना प्रत्यक्ष भेटता नाही आले तरी, आम्ही ऑनलाइन पद्धतीने समुपदेशन आणि सूचना देत होतो. रुग्णसंख्येतील वाढ लक्षात घेता शासनस्तरावर मानसिक ताण-तणावाच्या नियोजनासाठी एखादी हेल्पलाईन सुरू होणे गरजेचे आहे. 
- गौरी जानवेकर, मानसोपचार तज्ञ

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com