esakal | कंपवाताचा त्रास तरीही कोरोनाला हरवायची जिद्द; 70 वर्षीय महिलेने घेतला दुसरा डोस

बोलून बातमी शोधा

कंपवाताचा त्रास तरीही कोरोनाला हरवायची जिद्द; 70 वर्षीय महिलेने घेतला दुसरा डोस
कंपवाताचा त्रास तरीही कोरोनाला हरवायची जिद्द; 70 वर्षीय महिलेने घेतला दुसरा डोस
sakal_logo
By
टीम ई सकाळ

सहकारनगर : देशात सध्या कोरोनाचे लशीकरण सुरु आहे. कोरोनाविरोधातील लढा सध्या जोमाने सुरु असून लशीकरण हा त्यातलाच एक महत्त्वाचा पर्याय मानला जात आहे. येत्या एक मेपासून 18 वर्षे वयावरील नागरिकांचं लशीकरण होणार आहे तर याआधीच वय वर्षे 45 च्यावरील लोकांचं लशीकरण सुरु करण्यात आलं आहे.

कोरोनाविरोधातील लढ्यात प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने योगदान देत आहे. या काळात मास्क परिधान करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, हात धुणे आणि लस घेणे या गोष्टी करणे देखील मोठी गोष्ट आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील सहकारनगरमधील ही घटना आशादायी आहे. शिवदर्शन येथील राजीव गांधी ई लर्निंग स्कूल मधील  लसीकरण केंद्रावर सहकारनगर येथील सुरेखा शहा (वय. ७९) या  वृद्ध महिलेला कंपवात व्याधीचा त्रास असताना सुध्दा सुरेखा शहा यांनी लसीकरण केंद्रावर लसीकरणाचा दुसरा डोस घेतला. यावेळी सुरेखा शहा म्हणाल्या, राजीव गांधी ई लर्निंग स्कूल येथे लसीकरण व्यवस्था उत्कृष्ठ आहे.

हेही वाचा: 'सीरम'पाठोपाठ 'भारत बायोटेक'नेही कमी केली कोरोना लशीची किंमत

चार चाकी गाडीतून मला मुलाने या केंद्रावर घेऊन आला. यावेळी येथील हेमंत बागुल, हबीब शेख, सचिन पवार, हर्षद शेख, विशाल लोणारे इ. खुर्चीवर उचलून घेऊन लसीकरण केंद्रावर डोस दिला आणि पुन्हा गाडीत बसवले.या केंद्रावर जेवण, चहा, बिस्कीट, पाणी इ. सोय असून वृद्धांना मदत केली जात आहे.