महावितरण यंदा ही ऊस जळण्याची वाट पाहत आहे? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

नवनाथ भेके
Saturday, 24 October 2020

आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर नजीक असणाऱ्या जाळीच्या मळ्यात संदीप संपतराव वळसेपाटील यांचा सहा एकर ऊस आहे या ऊसाच्या शेतामधुन चार लोखंडी पोल टाकुन वीजेच्या तारा गेल्या आहेत परंतु या तारा सैल झाल्या असुन ऊसावर टेकल्या आहेत. यामुळे शॉर्टसक्रिटचा धोका निर्माण झाला आहे.

निरगुडसर (पुणे) : ऊसाच्या शेतात लोंबकळणाऱ्या वीजेच्या तारांमुळे हातातोंडाशी आलेले अडीच एकर ऊस दहा महिन्यापूर्वी जळाले त्यामुळे खुप नुकसान झाले भरपाई काही मिळाली नाही आताही तीच परिस्थिती असून पुढील काही महिन्यात तुटणाऱ्या सहा एकर ऊसावर जळण्याचे संकट आहे. तारांची दुरुस्ती होणार की नाही? का महावितरण यंदा ही ऊस जळण्याची वाट पाहत आहे ? असा सवाल शेतकरी संदीप संपतराव वळसे पाटील यांनी केला आहे.

आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर नजीक असणाऱ्या जाळीच्या मळ्यात संदीप संपतराव वळसेपाटील यांचा सहा एकर ऊस आहे या ऊसाच्या शेतामधुन चार लोखंडी पोल टाकुन वीजेच्या तारा गेल्या आहेत परंतु या तारा सैल झाल्या असुन ऊसावर टेकल्या आहेत. यामुळे शॉर्टसक्रिटचा धोका निर्माण झाला आहे.

होम क्वारंटाईन झाल्यानंतरही अजित पवारांचा कामाचा धडाका सुरूच

दहा महिन्यापूर्वी तोडणीला आलेला अडीच एकर ऊस जानेवारी महिन्यात जळाला त्यावेळी साडेतीन एकर ऊस जळण्यापासून वाचवल्याने अनर्थ टळला तरी प्रतिटन १५० रुपये कपात व जळालेला ऊस कारखान्यात जाईपर्यंत वजनात झालेली घटीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाल. त्यावेळी महावितरणकडुन तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली होती परंतु सध्या जैसे थे झाले असुन पुन्हा वीजेच्या तारा ऊसाच्या शेतात लोंबकळु लागल्या आहेत त्यामुळे सहा एकर ऊसावर जळण्याचे संकट उभे आहे.

पुढील काही महिन्यात खोडवा ऊस तुटणार आहे, त्यामुळे यंदाही महावितरण ऊस जळण्याची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल शेतकरी संदीप वळसे पाटील यांनी केला आहे.

बारामती : पोलिसांच्या ताण-तणाव व्यवस्थापनासाठी पोलिस अधीक्षक सरसावले!​

शेतकरी संदीप वळसेपाटील म्हणाले की,ऊसातुन गेलेल्या तारांच्या घर्षणामुळे दहा महिन्यापुर्वी अडीच एकर ऊस जळुन नुकसान झाले यंदाही तिच परिस्थिती असुन पुन्हा आग लागुन नुकसान झाली तर महावितरणने भरपाई दयावी नाही तर माझ्या शेतातील वीजेचे खांब काढुन बांधावर घ्यावे अन्यथा शेतातील खांब आम्ही काढु, असा इशारा दिला आहे.

 

धक्कादायक! नकाशात नाही रस्ता पण मंजूर झाला तब्बल 161 कोटींचा निधी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Possibility of burning sugarcane due to power lines hanging in the field but neglected by MSEDCL