पुणे-मुंबई एक्सप्रेस वे, सिंहगड, माळशेज परिसरात जाताय, तर ही बातमी नक्की वाचा

mal.jpg
mal.jpg

खडकवासला : मागील दोन दिवस संततधार पाऊस पडत आहे. हा पाऊस उद्याच्या दिवसभरात 200 मिलिमीटर पेक्षा जास्त होणार असल्याचा अंदाज हवामान विषयावर काम करणाऱ्या सतर्क संस्थेने व्यक्त केला आहे. यामुळे दरड पडणे, माती ढासळणे, भिंती पडणे घसरणे, झाडे पडण्याची असे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे एक्सप्रेस वे, ताम्हिणी, सिंहगड, पाबे, माळशेज, कसारा घाटात दरड पडण्याची शक्यता असल्याने या परिसरात आपत्ती व्यवस्थापन, पोलिस व वाहनचालक व नागरिकांनी काळजी घेणे महत्वाचे आहे.

हवामान विषयावर काम करणाऱ्या सतर्क संस्थेने 
१३ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी २ पुढील २४ तासांसाठी 
हा अंदाज वर्तवीला आहे. त्यांच्या ट्विट नुसार सलग दोन दिवस झालेला पाऊस आणि पावसाचा आगामी अंदाज लक्षात घेता, पुढील भागात आगामी २४ तासांत डोंगरावरून दगड, माती घसरून येणे, झाडे, भिंती पडणे आदी प्रकार घडण्याची सर्वसाधारण शक्यता आहे.

संबंधित भागातील रहिवाशांनी आणि त्या भागातून प्रवास करणाऱ्यांनी काळजी घ्यावी- वरंध घाट, सिंहगड, ताम्हिणी, वेल्हे, रायगड, महाड, आंबेनळी, पोलादपूर, माथेरान, खंडाळा, कार्ले,कामशेत, आडोशी, मुंबईपुणे हायवे, उर्से खिंड, माळशेज, कसारा घाट, रायगड जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्ग येथे ही काळजी घ्यावी.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com