पावसाच्या उघडिपीने वाढला उन्हाचा चटका

पावसाच्या उघडिपीने वाढला उन्हाचा चटका

पुणे - राज्यात पावसाने विश्रांती घेतल्याने आणि ढगाळ वातावरण कमी झाल्याने उन्हाचा चटका वाढू लागला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांनंतर ‘ऑक्‍टोबर हीट’ वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पुण्यात उन्हाचा चटका वाढणार असला, तरीही येत्या दोन दिवसांमध्ये पावसाच्या हलक्‍या सरींची शक्‍यता व्यक्त करण्यात आली आहे.

नाशिकमध्ये वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह जोरदार पावसाचा; मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, सोलापूर, नांदेड, हिंगोलीत मेघगर्जनेसह मध्यम पावसाचा अंदाज आहे.

पुण्यात हलक्‍या सरींची शक्‍यता
पुण्यात पुढील दोन दिवसांमध्ये उन्हाचा चटका वाढणार असल्याची शक्‍यता व्यक्त करण्यात आली आहे. शहरात येत्या सोमवारी (ता. ३०) तापमान ३१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढणार असून, त्यानंतर चोवीस तासांमध्ये म्हणजे मंगळवारपर्यंत (ता. १) कमाल तापमानाचा पारा ३२ अंश सेल्सिअसपर्यंत उसळी मारेल, असेही खात्याने सांगितले. यादरम्यान पुण्यात पावसाच्या हलक्‍या सरी पडतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com