टपाल कर्मचाऱ्यांचा उद्यापासून संप

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

मंचर - गेली आठ वर्षे पत्रव्यवहार व आंदोलन करून प्रलंबित मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी ग्रामीण डाक विभागाचे कर्मचारी केंद्र सरकारकडे प्रयत्न करत आहेत. पण केंद्र सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत असून, देशभरातील ग्रामीण भागातील दोन लाख ७० हजार डाक कर्मचारी मंगळवारपासून (ता. २२) बेमुदत संपावर जाणार आहेत, अशी माहिती ग्रामीण डाक कर्मचारी संघाचे विभागीय सचिव एकनाथ मंडलिक यांनी दिली. 

ते म्हणाले, की पोस्ट खात्याची निर्मिती होऊन १५० वर्षे पूर्ण झाली आहेत. ग्रामीण भागातील जनतेला पोस्टाच्या माध्यमातून उत्तम सेवा देण्याचे काम डाक कर्मचाऱ्यांनी केले आहे. कोणताही आयोग लागू होताना विभागीय कर्मचाऱ्यांसाठी वेगळी समिती व खातेबाह्य कर्मचाऱ्यांसाठी वेगळी समिती नेमण्यात येते. विभागीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होऊन २९ महिने झाले. पण खातेबाह्य कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू करण्यासंदर्भातील फाइल मात्र मंत्रालयात धूळ खात पडली आहे. कार्यालयीन कामकाजाची वेळ पाच तासांची, पण प्रत्यक्षात काम आठ तास करून घेतले जाते. पगार मात्र पाच तासांचा दिला जातो. उन्हाळा, पावसाळा व हिवाळ्यात काम करावे लागते. अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

अशा आहेत मागण्या 
खातेबाह्य कर्मचाऱ्यांना पेन्शन सुविधा नाही. त्यामुळे वेतन आयोग लागू करावा, जेवढे काम तेवढा पगार द्यावा. पेन्शन सुविधा सुरू करावी. खातेबाह्य कर्मचाऱ्यांचा खात्यात समावेश करून घ्यावा. अशा विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी ग्रामीण डाक कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत.

Web Title: post employee strike