पुण्यात 'मी अधिकारी' नावाच्या पोस्टरने खळबळ?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 एप्रिल 2019

पुण्यातील सदाशिव पेठेत 'मी अधिकारी' नावाचे पोस्टर
सगळीकडे चर्चेचा विषय
सदाशिव पेठेसह, नवी पेठ, गांजवे चौक, अलका चौक, डेक्कन, नारायण पेठ, शनिवार पेठ आणि शिवाजीनगर या भागात पोस्टर

पुणे: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रमुख केंद्र असलेल्या सदाशिव पेठेत 'मी अधिकारी' नावाचे पोस्टर लावण्यात आले आहेत. त्यामुळे हा नक्की काय प्रकार आहे हे सकाळपासून सगळीकडे चर्चेचा विषय बनला आहे.

मी अधिकारी नावाचे पोस्टर सदाशिव पेठेसह, नवी पेठ, गाजवे चौक, अलका चौक, डेक्कन, नारायण पेठ, शनिवार पेठ आणि शिवाजीनगर या भागात लावण्यात आले आहेत.

या पोस्टरच्या मागे कोण आहे याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, अद्याप हे कोणी आणि कशासाठी केले आहे याचे कारण समजू शकलेले नाही. दरम्यान, या पोस्टरवर केवळ मी अधिकारी असा मजकूर लिहलेला असून आणखी कुठल्याही प्रकारचा मजकूर या पोस्टरवर लिहण्यात आलेला नाही.

Web Title: poster named Mi Adhikari in sadashiv peth Pune