शंभर नगरसेवक आमदार आठ, पुण्याच्या पाण्याची लावली वाट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 जानेवारी 2019

पुणे : पुण्यात पाणी प्रश्नावरुन राजकारण पेटलेले असताना निषेध व्यक्त करण्यासाठी पोस्टरबाजीचा नवा ट्रेंड सुरु केला आहे. काही दिवासांपुर्वी पाणी प्रश्नावरुव पालकमंत्री गिरिष बापट यांच्यावर पोस्टरमधून टिका करण्यात आली होती. आता पुन्हा ''गल्ली ते दिल्ली तुमचा थाट...शंभर नगरसेवक आमदार आठ...पुण्याच्या पाण्याची लावली वाट'....अशा आशयाच्या पोस्टरमधून पुणेकरांनी भाजपावर जोरदार टिका केली आहे. पुण्यातील शिमला ऑफिस चौकात हे पोस्टर लावण्यात आले आहेत.

पुण्यातील पाणी प्रश्नावरुन महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यातील वादात पुणेकर भरडले जात आहे. धरणातील पाणीसाठा आणि पाण्याचा प्रत्यक्ष वापर यामुळे पाटबंधारे खात्याने तीन दिवसांपूर्वी दोन पंप बंद केले होते. त्यामुळे पाणीसाठ्यात दोन ते अडीचशे एमएलडी कपात होण्याची शक्‍यता होती. पाटबंधारे खात्याने अचानक पंप बंद केल्याने पुणेकरांसह महापालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. तेव्हा महापौरांनी पाटबंधारे खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पंप सुरू करण्याची सूचना केली. त्यापलीकडे जाऊन पुन्हा बंद करण्याचे धाडस दाखविल्यास पोलिसांकडे गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला. 

यापार्श्वभूमीवर वैतागलेल्या पुणेकरांनी असे पोस्टर लावले असल्याची चर्चा सुरु आहे. पुणे शहरात शंभर नगरसेवक आहेत तर आठ आमदार असून देखील पुण्याच्या पाणी प्रश्नांवर अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे पुणेकरांनी या पोस्टरमधून नाराजी व्यक्त केली आहे. 

Web Title: posters against bjp on water issue