गिरीश, काय हे! अजितनंही कधी पुण्याला पाणी कमी पडू दिलं नव्हतं..!!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गेल्या काही दिवसांपासून फ्लेक्सबाजी होताना दिसत आहे. यापूर्वी 'शिवडे...आय एम सॉरी...' तर कधी 'आपण यांना पाहिलंत का?' तर नुकतेच 'दादा, आय एम प्रेग्नंट' अशा आशयाचे फ्लेक्स लागले होते. त्यानंतर आता पुण्यात 'गिरीष काय रे? दुष्काळ असतानासुद्धा अजितने कधी पाणी कमी पडू दिले नाही! तु तर आपल्या शहरातला ना? पाणी कुठं मुरतय?', अशा आशयाचे फ्लेक्स झळकत असल्याने पुणेकरांचे लक्ष वेधून घेत आहे.

पिंपरी-चिंचवड परिसरात यापूर्वी 'ओ नगरसेवक भाऊ, तुम्हाला कुणीही रागावणार नाही, प्लिज, तुम्ही परत या...' याशिवाय कधी 'शिवडे.. आय एम सॉरी...' तर कधी 'आपण यांना पाहिलत कां?', यांसारख्या मजकूर असलेले बॅनरने पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील लोकांचे लक्ष वेधून घेतले होते. या प्लेक्सबाजीतून मनोरंजन तर कधी राजकीय वातावरणात चर्चा करण्यास भाग पडले. पाणी प्रश्नावरून पालकमंत्री गिरीश बापट व महापालिकेतील सत्ताधारी भाजपला गिरीष काय रे? दुष्काळ असतानासुद्धा अजितने कधी पाणी कमी पडू दिले नाही! तु तर आपल्या शहरातला ना? पाणी कुठं मुरतय?,.अशा मजकूराचे बॅनर झळकत आहे.

दरम्यान, या बॅनरच्या शेवटी 'एक त्रस्त पुणेकर नागरिक' म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, हे बॅनर नेमकं कोणी आणि कधी  लावले याबाबतची माहिती अद्याप समजू शकली नाही. 

Web Title: Posters displayed in Pune criticising Girish Bapat over water supply to the city