बटाटा पिक फुलोऱ्यात; सातगाव पठारावर शेतीचे नयनरम्य दृश्य

जयदीप हिरवे
Monday, 10 August 2020

खरीप हंगामात सर्वाधिक बटाट्याची लागवड सातगाव पठार भागात केली जाते. पेठ, पारगाव, कोल्हारवाडी, कुरवंडी, थुगाव, भावडी, कारेगाव हा परिसर बटाट्याचे आगार म्हणून प्रसिद्ध आहे. दर वर्षी जून महिन्यात या भागात शेतकरी बटाटा पिकाची लागवड करतात. या हंगामात बटाटा लागवडीसाठी शेतकर्‍यांना पावसाची प्रतीक्षा करावी लागली.

सातगाव पठार (पुणे) : सातगाव पठार (ता.आंबेगाव) परीसरात खरीप हंगामात हजारो एकर शेतीक्षेत्रात लागवड केलेले बटाटा पिक चांगलेच जोमात आले असून आता हे पिक फुलोऱ्यात आल्याने सातगाव पठारावर शेतीचे नयनरम्य दृश्य जागोजागी पहावयास मिळत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

खरीप हंगामात सर्वाधिक बटाट्याची लागवड सातगाव पठार भागात केली जाते. पेठ, पारगाव, कोल्हारवाडी, कुरवंडी, थुगाव, भावडी, कारेगाव हा परिसर बटाट्याचे आगार म्हणून प्रसिद्ध आहे. दर वर्षी जून महिन्यात या भागात शेतकरी बटाटा पिकाची लागवड करतात. या हंगामात बटाटा लागवडीसाठी शेतकर्‍यांना पावसाची प्रतीक्षा करावी लागली. अल्पशा पावसावरच शेतकऱ्यांनी लागवडी केल्या. मात्र, लागवडीनंतर बरेच दिवस पाऊस झाला नाही त्यामुळे शेतकरी चिंतेत पडला होता. मात्र श्रावण सुरू होताच पावसाने हजेरी लावल्याने बटाटा पिकाला जिवदानच मिळाले आणि बटाटा पिकाचा धोका टळला.

पाऊस झाल्यावर लगेचच शेतकऱ्यांनी पिकावर औषधांच्या फवारण्या सुरू केल्या. आता हे पिक चांगलेच जोमदार आले असून पिकांना फुले येण्यास सुरवात झाली आहे. सर्वात जास्त क्षेत्र या बटाटा पिकाचे असल्याने व या पिकास फुले येवू लागल्याने सर्वच पठार भागात या पिकाचे मनमोहक नयनरम्य असे दृश्य जागेजागी  पहावयास मिळत आहे.

पुण्यात वाळू माफियांच्या टोळीकडून दोन पत्रकारांवर खुनी हल्ला

वेळेवर झालेल्या पावसामुळे बटाटा पिक तरारले असून फुलोऱ्यात आले आहे.  मात्र जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यासाठी अजुनही जोरदार पावसाची गरज आहे. तुर्तास बटाट्यावरील संकट टळल्याने आम्ही सर्व बटाटा उत्पादक शेतकरी आनंदी आहोत अशी प्रतिक्रिया भावडी ता.आंबेगाव येथील बटाटा उत्पादक शेतकरी सोपान नवले यांनी दिली. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Potato crop in growing well on Satgaon pathar