पिंपरी - खड्डेच खड्डे चोहिकडे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

पिंपरी - अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी रात्रीपासून शहरात जोरदार हजेरी लावली. सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाल्याचे चित्र शहरातील अनेक भागांमध्ये पाहायला मिळाले. श्रावण महिन्याला सुरवात झाल्यापासून अधूनमधून तुरळक पावसाच्या सरी पडत होत्या. पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्‍यता आहे. 

गेल्या दोन दिवसांपासून शहरात पुन्हा एकदा पावसाने जोर पकडला आहे. सातत्याने बरसणाऱ्या पावसामुळे रस्त्याची पूर्णपणे वाताहत झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे फुल झाल्याने नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 

शहरात जुलैमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर महिन्याभराच्या अवधीनंतर पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरवात झाली आहे. सोमवारपासून बरसणाऱ्या पावसामुळे अनेक रस्त्यावर पुन्हा खड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर दापोडी ते भक्‍ती-शक्‍ती चौकापर्यंतच्या रस्त्यावर अनेक भागात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. कासारवाडीतून पिंपरीकडे येणारा सेवा रस्ता पूर्णपणे उखडला असून, वाहन चालवताना चालकांना कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू असल्याने या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. तसेच शहरातील चिंचवडगाव, वाकड, पिंपरी, निगडी, आकुर्डी, भोसरी, मोशी या परिसरातील रस्ते पावसामुळे खराब झाले आहेत. 

खड्डे दुरुस्तीकडे पालिकेचे दुर्लक्ष 
पावसाळा सुरू झाल्यापासून अनेक रस्त्यावर खड्डे  पडले आहेत. महापालिका प्रशासन दुरुस्तीच्या कामाकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास खड्ड्यांचे प्रमाण वाढेल. त्यामुळे पालिका प्रशासनाने तत्काळ खड्डे बुजविण्याची आवश्‍यकता आहे.

Web Title: Potholes in PCMC