जुनी सांगवीत खड्डयांची डागडुजी

रमेश मोरे
गुरुवार, 19 जुलै 2018

जुनी सांगवी - संततधार पावसामुळे जुनी सांगवी प्रभागात पडलेल्या खड्ड्यांच्या डागडुजीचे काम महापालिका स्थापत्य विभागाकडुन करण्यात येत आहे. ऐन पावसात येथे नुकतेच खडी डांबर टाकुन खड्डे बुजविण्यात आले होते. मात्र संततधार पावसामुळे 'केले पण वाया गेले' असे म्हणण्याची वेळ आली. आठवडाभर लागुन राहिलेल्या संततधार पावसाने काम केलेल्या खंड्ड्यांमधील डांबर खडी निघाल्याने ठिकठिकाणचे खड्डे उघडे पडले. परिणामी सांगवीकरांना खड्ड्यातुन रहदारी करावी लागली. 

यामुळे गाड्या घसरून पडण्याच्या किरकोळ अपघातांनाही नागरिकांना सामोरे जावे लागले. औंध, पुण्याकडे ये जा करण्यासाठी या रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. याबाबत सोमवार ता.१६ सकाळमधुन बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. आता पुन्हा नवीन जेट पेचर तंत्रज्ञानाच्या हे खड्डे बुजविले जात आहेत. येथील मुळानदी किनारा रस्ता, पी.डब्ल्यु.डी.रस्ता, संगमनगर आदी भागातील खड्डे बुजविण्याचे काम सुरू असल्याचे स्थापत्य कनिष्ठ अभियंता सचिन सानप यांनी सांगीतले.

संततधार पावसामुळे पडलेले खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. प्रभागातील सर्व खड्डे बुजवण्याच्या स्थापत्य विभागाला सुचना दिल्या आहेत. 
- संतोष कांबळे - नगरसेवक

Web Title: Potholes repaired in juni sanghvi