esakal | आसूड मारून घेणाऱ्या पोतराज बांधवांवर उपासमारीची वेळ

बोलून बातमी शोधा

potaj
आसूड मारून घेणाऱ्या पोतराज बांधवांवर उपासमारीची वेळ
sakal_logo
By
चेतन मुळुक

आनंदनगर : ''बाई बाई तुमचं लेण काई...पांढराच पंखा हिरवी खण चोळी...लिंबाचं नेसण अन् गाड्यावर बसण ....बोला डोंगरावरच्या आईचं चांगभलं..''पाडवा पार पडला अन् उन_ चढणीला लागले की गावोगावी जत्रात पोतराजची आरोळी कानावर कायम कानावर पडत राहायची. परंतु गेल्या वर्षी मार्च महिन्यात गावच्या जत्रा बंद पडल्या अन् गावच्या बारा बलुतेदारमधील 'पोतराज'ची उपासमार होऊ लागली.

वितभर पोटाच्या खळग्याला खायला लागत म्हणून पोट भरण्यासाठी गावातल्या पोतराजनी आपला मोर्चा शहराकडे वळवला. गेल्या वर्षी पासून पुण्यातल्या ठिकठिकाणच्या सिग्नलला थांबलो असता भर उन्हात पोतराज स्वतःला आसूड मारून घेत भिक्षा मागत असताना दिसतात. मात्र, यंदा देखील लॉकडाऊन झालं आणि समाजातल्या शेवटच्या घटकातील पोतराज'ची पुन्हा सोसेहाल सुरू झाले.

हेही वाचा: राजीव गांधी रुग्णालयात हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्लांट

'सकाळ'ने त्याची व्यथा समजून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा "काय सांगु दादा लय बेक्कार हाल झालेत बघ...गेल्या महिन्यात सिग्नलवर रोज दोन, तीनशे कसं बसं मिळत आता शंभर रुपडी मिळणा झालंय, रस्त्यावर पहिल्यासारखी लोकं बी फिरना झाल्यात. त्यामुळं आमची लई मोठी पंचाईत होऊन बसलीय बघ"...अशी भावना सिंहगड रोडवरील सिग्नल वरच्या एका पोतराज ने "सकाळ" कडे मांडली .

संचारबंदी लागू असल्याने रस्त्यांवर अल्प प्रमाणात प्रवासी वाहने प्रवास करतात. रस्त्यावर प्रवास फक्त अत्यावश्यक सेवातील अथवा इतर कामगार वर्ग प्रवास करत असल्याने त्याच्या थेट परिणाम हा पोतराजाच्या जीवनमानावर झालेला दिसतो. रस्त्यावर पैसे मागून आपला उदरनिर्वाह करणारा पोतराज कोरोना काळातील संचारबंदीमुळे संकटात सापडला आहे. रस्त्यावर भिक्षा देण्यासाठी प्रवासी नागरीक नसल्याने पोतराज वरती उपासमारी ची वेळ आली आहे.

हेही वाचा: म्हणून चाचण्या कमी, अतिरिक्त आयुक्तांनी सांगितले कारण

रंगाच्या वेशभूषा मुळे लक्ष वेधूक ठरतात पोतराज:

गावोगावी फिरून आपली गुजराण करणारे पोतराजची संख्या कमी होत असली तरी आणखीन ही सिग्नल वर रहदारीच्या ठिकाणी स्री वेषात , कंबरेभोवती हिरव्या खणांचा घागरा, कंबरेचा वरचा भाग उघडा, राखलेल्या मिशा, स्त्रियांप्रमाने वाढलेला केसांचा अंबाडा, कपाळावर हळदी कुंकवाचा मळवट, त्याच्या पत्नीच्या डोक्यावर मरीआई चा देव्हारा, हातात मोरपिसाचा कुंचा , अशी वेशभूषा असणारा पोतराज सर्वांचे लक्ष वेधून घेतात.

"लॉकडाऊन असल्यामुळं कसं बसं पोट भरलं एवढंच बघत आहे. घरातील पोराबळांची कशीबशी पोट भरायची हा प्रश्न सारखा पडत असतो. उद्याचा दिवसाला पोटाला अन्न मिळेल का ? हे सांगणं पण अवघड आहे. लॉकडाऊन कधी लवकरात लवकर उघडलं याचीच वाट बघतोय."

- लखन केंगार ( पोतराज )

हेही वाचा: रोहित जैसा कोई नहीं; टपोरी लँगवेज ते विसराळूपणाचे किस्से