कर्मयाेगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केली पक्ष्यांसाठी भांडी

राजकुमार थोरात
शुक्रवार, 16 मार्च 2018

वालचंदनगर (पुणे) : कुरवली (ता.इंदापूर) येथील कर्मयाेगी शंकरराव पाटील विद्यालयातील तीनशे विद्यार्थ्यांनी टाकावू वस्तुपासुन पक्ष्यांसाठी  चारा व पाणी ठेवण्यासाठी भांडी तयार केली आहेत.

वालचंदनगर (पुणे) : कुरवली (ता.इंदापूर) येथील कर्मयाेगी शंकरराव पाटील विद्यालयातील तीनशे विद्यार्थ्यांनी टाकावू वस्तुपासुन पक्ष्यांसाठी  चारा व पाणी ठेवण्यासाठी भांडी तयार केली आहेत.

निसर्गाच्या चक्रामध्ये प्रत्येक जीव असाधारण महत्व असते. सर्व घटना एकमेकावरती अवलंबून असतात. एखाद्या पक्षाच्या, प्राण्याची संख्या कमी जास्त झाल्यास निर्सगाचे चक्र बदलते. निसर्गाचा समतोल बिघडल्यास नैसर्गिक आप्तीला सामोरे जावे लागत आहे. उन्हाळ्यामध्ये पाणी, चाऱ्यावाचून अनेक पक्षांना जीव गमवावा लागतो. हे टाळण्यासाठी कुरवली (ता.इंदापूर) येथील कर्मयाेगी शंकरराव पाटील विद्यालयातील इयत्ता चौथीतील तीनशे विद्यार्थ्यांनी पाण्याच्या बाटल्या, गवताच्या काड्या, मातीची भांड्याचा वापर करुन पक्ष्यांसाठी  चारा व पाणी ठेवण्यासाठी भांडी तयार केली आहेत.

ही शाळेच्या परीसरामध्ये असणाऱ्या झाडावरती बांधण्यास सुरवात केली आहे. तसेच शाळेतील विद्यार्थी घराजवळ असणाऱ्या झाडांना भांडी बांधणार असून भांड्यामध्ये दररोज नियमित पक्ष्यांसाठी चारा (धान्य) व पाणी ठेवणार आहेत. विद्यार्थ्यांना भांडी तयार करण्यासाठी शाळेचे प्राचार्य गणेश घोरपडे, कलाशिक्षक बापूराव कदम,शाेभा पोळ, शिवाजी मोरे यांनी मदत केली.संस्थेचे अध्यक्ष माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील,सचिव किरण पाटील, नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Web Title: Pots for birds prepared by Karmayagai school students