पावडर शेडींगमध्ये बहरलेला वसंत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 ऑक्टोबर 2018

पुणे : सिनेअभिनेत्रे अशोक कुमार, व्ही. शांताराम यांच्याकडे काम करणारा कामगार ते एक प्रथितयश चित्रकार असा प्रवास करणारे वसंत फणसळकर हे आता निवृत्तीनंतर कोथरुडमध्ये आपल्या कलेचा वारसा निर्माण करत आहेत

पुणे : सिनेअभिनेत्रे अशोक कुमार, व्ही. शांताराम यांच्याकडे काम करणारा कामगार ते एक प्रथितयश चित्रकार असा प्रवास करणारे वसंत फणसळकर हे आता निवृत्तीनंतर कोथरुडमध्ये आपल्या कलेचा वारसा निर्माण करत आहेत

इंडस्ट्रीयल हेल्थ अँड सेफ्टी असोसिएशन मुंबई या संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या सेफ्टी पोस्टर स्पर्धेत 1976- 77-78 या वर्षी सलग तीन वर्षे फणसळकरांनी बक्षिस मिळवले. 1979 साली अखिल भारतीय पातळीवर दुस-या क्रमांकाचे बक्षिस मिळाले. 1986 साली तत्कालीन केंद्रीय श्रम मंत्री पी. ए. संगमा यांच्या हस्ते इंडस्ट्रियल सेफ्टी पोस्टर स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल सुवर्णपदक देण्यात आले. पोट्रॅट व्यक्तिचित्र हा फणसळकरांचा आवडता विषय. पावडर शेडिंग प्रकारात त्यांचा हातखंडा आहे.

पावडर शेडिंग म्हणजे कृष्ण धवल छाया प्रकाशाचा खेळ. स्टंपिंग पावडर या नावाची काळी व सेफिया रंगाची पाडर, ड्राइंग साहित्य मिळण्याच्या दुकानात मिळते. व त्याच्या जोडीला स्टंप म्हणजे ब्लॉटिंग पेपर सारख्या मशिनवर तयार केलेले साधारण सिगारेट किंवा विडीच्या आकाराचे स्टंपस् शेडिंग करण्यासाठी मिळतात. काळी पावडर कागदावर थोडी काढून घेऊन स्टंपच्या साह्याने चित्राला छाया प्रकाशाचा परिणाम आणता येतो. त्यापूर्वी आपल्यालाल ज्या व्यक्तिचे चित्र काढावयाचे असेल त्या व्यक्तिचे प्रथम रेखा चित्र कागदावर काढून घ्यावे लागते. त्यानंतर त्यामध्ये छाया प्रकाशाचा परिणाम आणावा लागतो. हे झाल्यावर एका पातळ कपड्याने सर्व चित्रावर एक टोन पसरावा लागतो. त्या नंतर पुन्हा ज्या ठिकाणी जा्सत प्रमाणात काळ्या रंगाची जरुरी असेल, उदाहरणार्थ केस, डोळ्यातील बुबुळ, नाकातील होल, कान या सारख्या ठिकाणी पुन्हा हळूवार हातानी काळा टोन वाढवावा लागतो. नंतर खोड रबराच्या साह्याने खोड रबरला पेन्सील सारखे टोक करुन चेह-यावरील धवल भागात (पांढ-या प्रकाशातील भागात) सूक्ष्म अवयव दाखवावे लागतात. त्याच प्रमाणे शेडकडच्या भागातही क्रॉउन स्टीक किंवा चारकोल पेन्सिलच्या साह्यााने सुक्ष्म अवयव दाखवावे लागतात.

शेवटी चारकोल पेन्सीलच्या साह्याने बारीक सारीक काम फिनीशींग करावे लागते. आता आधुनिक तंत्रज्ञानाने पावडर शेडिंग हा प्रकार जवळजवळ संपत आला आहे. कलर फोटोग्राफी, डिजिटल कॅमेरा, संगणक यासारखी जलद यंत्र सामुग्री निघाल्यामुळे तसे हाताने करावयाचे काम फारसे अस्तित्वात राहिलेले नाही. तरी पण काही लोकांच्या तोंडून असे ऐकावयास मिळते की, आधुनिक तंत्रज्ञान कितीही पुढे गेले असले तरीही हाताने व कुंचल्याच्या सहाय्याने केलेल्या कलेची मजा काही औरच असते. म्हणजे हस्तकला ही हस्तकलाच राहणार आहे.

घरगुती वातावरण अनुकूल नसल्यामुळे उच्चशिक्षण घेता आले नाही. विविध प्रकारची कामे करुन शिक्षण घेतल्यामुळे जो अनुभव मिळाला त्याचा उपयोग जीवनात ठिकठिकाणी झाला. लोप पावत चाललेल्या पावडर शेडिंगला पुन्हा उजेडात आणण्यासाठी, ही कला टिकावी यासाठी माझा प्रयत्न आहे

Web Title: powder shading art by Vasant Phansalkar