Pune Rains : सव्वा लाख ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

Pune Rains : सव्वा लाख ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

पुणे - मुसळधार पावसाचा फटका महावितरणच्या पर्वती, पद्मावती, रास्ता पेठ, शिवाजीनगर विभागासह पुणे ग्रामीणमधील मुळशी केंद्राला बसला. जवळपास एक लाख २५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बुधवारी रात्री खंडित झाला. काही ठिकाणी सुरक्षिततेच्या कारणासाठी वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला, तर काही ठिकाणी वीजवाहिन्या तुटल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. गुरुवारी दुपारपर्यंत शहराच्या अनेक भागांत वीजपुरवठा सुरळीत होऊ शकला नाही.

बुधवारी रात्री सुरक्षिततेच्या कारणासाठी पद्मावती विभागातील १४ पैकी ११ वीज उपकेंद्राचा पुरवठा रात्री बंद ठेवण्यात आला. तर, भिलारवाडी येथे ओढ्यालागत असलेले तीन ट्रान्सफॉर्मर पडले. कोंढवा खुर्द, कोंढवा बुद्रुक, लुल्लानगर, एनआयबीएम व घोरपडी बाजारातही वीजपुरवठा खंडित झाला होता. वीजपुरवठा आज सायंकाळी  सुरळीत झाला. 


धायरी, सहकारनगर व सिंहगड येथील भागात उच्चदाब वाहिनीचे सात खांब पावसामुळे पडले. खेड, नसरापूर व शिवापूर येथील नदीकाठी असलेली पाच रोहित्रे पाण्यात गेल्यानंतर त्यांचा पुरवठा बंद ठेवला होता. तर, बालेवाडी, म्हाळुंगे, सूसगाव, बाणेर व बोपोडी गावठाण या परिसरातील अडीच हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com