कुंभारगांव पाणी पुरवठा विद्युत पंपास सौर उर्जेद्वारे वीज पुरवठा

प्रा. प्रशांत चवरे
रविवार, 8 जुलै 2018

कुंभारगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाणी पुरवठा सौर उर्जेच्या माध्यमातून वीज पुरवठा योजनेचा नुकताच शुभांरभ करण्यात आला.

भिगवण - ग्रामपंचायतीचे वीजबील थकले की महावितरण कंपनीकडुन वीज पुरवठा खंडीत केला जातो व त्याचा फटका सार्वजनिक पाणी पुरवठ्यास व पर्यायाने ग्रामस्थांना बसतो असे चित्र सर्वत्र पहावयास मिळतो. यावरच उपाय म्हणुन इंदापुर तालुक्यातील कुंभारगांव ग्रामपंचायतीने गावास पाणी पुरवठा करणाऱ्या विद्युत पंपास सौज उर्जेद्वारे वीज पुरवठा सुरु केला आहे. सौर उर्जेच्या माध्यमातून वीज पुरवठा सुरु झाल्यामुळे अतिरिक्त वीजबिलाबरोबर खंडीत वीज पुरवठा त्रासातुनही ग्रामस्थाची सुटका झाली आहे.

कुंभारगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाणी पुरवठा सौर उर्जेच्या माध्यमातून वीज पुरवठा योजनेचा नुकताच शुभांरभ करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या लघुजल व नळपाणी पुरवठा कार्यक्रमाअंतर्गत पाणी पुरवठा योजनेस सौरपंप देण्याची योजना सुरु करण्यात आली आहे. कुंभारगांव ग्रामपंचायतीच्या वतीने सदर योजनेसाठी शासनाकडे प्रस्ताव दाखल केला होता. सरपंच जयश्री धुमाळ, उपसरपंच मंगल धुमाळ, ग्रामसेवक दादासाहेब बंडगर व ग्रामपंचायत सदस्यांच्या माध्यमातून यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता. ग्रामपंचायतीच्या प्रस्तावास मंजुरी मिळुन अक्षय सोलर पॉवर या कंपनीच्या वतीने कुंभारगांव येथील पाणी पुरवठा विहीरीवर सौर उर्जेच्या माध्यमातून विद्युत पंपास वीज पुरवठा करणारी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. योजनेअंतर्गत ५ अश्वशक्तीचा विद्दुत पंप कार्यान्वित करण्यात आला असुन त्यामाध्यमातून गावास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. नुकताच या योजनेचा शुभारंभ सरपंच उपसरपंच व ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आाला. 

याबाबत कुंभारगावच्या सरपंच जयश्री धूमाळ म्हणाल्या, ग्रामपंचातीस येणाऱ्या वीजबिलामुळे ग्रामपंचायतीवर मोठा आर्थिक ताण येत होता. सौर उर्जेवर सार्वजनिक पाणी पुरवठ्याचा विद्दुत पंप सुरु केल्यामुळे ग्रामपंचायतीची अतिरिक्त विज बिलातून सुटका होईल व ग्रामस्थांनी नियमित पाणी पुरवठा होईल.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Power supply through Solar Power to Kumbhargaon Water Supply Power Pumps