esakal | किरकटवाडी-खडकवासल्यात आज - उद्या वीजपुरवठा बंद

बोलून बातमी शोधा

kharadi

किरकटवाडी-खडकवासल्यात आज - उद्या वीजपुरवठा बंद

sakal_logo
By
निलेश बोरुडे

किरकटवाडी: किरकटवाडी आणि खडकवासला या दोन्ही गावांच्या परिसरात वीजेच्या तारांवर आलेल्या झाडांच्या फांद्या तोडणे, धोकादायक खांब व तुटलेल्या तारांची दुरुस्ती करणे अशी पावसाळ्यापूर्वीची कामे सुरू असल्याने आज किरकटवाडी तर उद्या खडकवासला येथे वीजपुरवठा बंद राहणार आहे.

पावसाळ्यात होणारे अपघात आणि दुर्घटना टाळण्यासाठी महावितरणकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्तीची कामे करुन घेतली जातात. वीजेच्या तारांवर आलेल्या झाडांच्या फांद्या तोडून घेतल्या जातात.

हेही वाचा: ''खराडी कोव्हिड सेंटरच्या ऑक्सिजन पुरवठ्याचा सर्व खर्च आम्ही पेलणार''

आज किरकटवाडी येथे सकाळी 10 वाजल्यापासून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी कामाला सुरुवात केली आहे. दरम्यान खबरदारी म्हणून सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच आजच्याप्रमाणे उद्याही खडकवासला येथे काम करण्यात येणार असून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या वडगाव बुद्रुक उपविभागाचे सहाय्यक अभियंता सचिन आंबवले व अतिरिक्त अभियंता कल्याण गिरी यांनी केले आहे.

'वर्क फ्रॉम होम' करणारांची अडचण

सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने निर्बंध घातल्याने अनेक नोकरदारांचे घरुनच काम सुरू आहे. मात्र अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने 'वर्क फ्रॉम होम' करणारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकांनी वीज गेल्याबाबत ऑनलाईन तक्रारीही केल्या आहेत. महावितरणने कोणतीही पुर्वकल्पना न देता वीजपुरवठा खंडित केला असल्याबाबत व्हॉट्स ॲप गृपवरुन चर्चा सुरू आहेत.