विधानपरिषद- आघाडीत बिघाडी व युतीचाही बेरंग

उत्तम कुटे
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

पिंपरी : विधान परिषदेच्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्था
मतदारसंघाचा निकाल अनेक अर्थाने वैशिष्टपूर्ण ठरला आहे. राज्यातील सहा
निकालांपैकी सर्वाधिक मते आणि मताधिक्‍य याच मतदारसंघातील विजयी
उमेदवाराने घेतले. सत्ताधारी युतीची 14 मते फोडण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला यश आले.आघाडीतील मित्रपक्षाला,तर त्यांनी खिंडारच पाडले. त्यामुळे येथील राष्ट्रवादीचे अनिल भोसले यांचा दणदणीत विजय झाला.
मतदारसंघातील ताकद (मते) पाहता कॉंग्रेस दुसऱ्या कमाकांवर अपेक्षित
असताना ती तिसऱ्या स्थानी फेकली गेली, त्यातूनच हा निकाल

त्यांच्यादृष्टीने अधिक धक्का देणारा ठरला.तर,पराजित होऊनही कॉंग्रेसच्या
तुलनेत आपली मते काहीशी शाबूत ठेवल्याने भाजप अनपेक्षितपणे दुसऱ्या
क्रमांकांवर आला.

पुण्याचा निकाल राष्ट्रवादीला सुखावणारा असला,तरी एकूण राज्यातील सहा
जागांचे निकाल त्यांच्या दृष्टीने धक्कादायक आहेत. सांगली-साताऱ्याची
जागा त्यांच्या हातून गेली आहे.घोडेबाजार करणारे बलदंड उमेदवारच सर्व सहा जागी निवडून आले आहेत. पुण्यातून भोसले दुसऱ्यांदा निवडले गेले आहेत. इतर निवडणुकीतील सर्वसामान्य अशिक्षित मतदारांप्रमाणे या निवडणुकीतही आठ मतदारांची मते बाद झाली,ही ठळक बाब म्हणावी लागेल.

पुण्याचा निकाल राष्ट्रवादीच्या दृष्टीने अपेक्षितच होता. मात्र, 307
एवढे मोठे मताधिक्‍य मिळेल, असे त्यांना वाटले नव्हते.आपल्या एकूण
मतांपेक्षा (298) तब्बल 142 मते त्यांना अधिक मिळाली.त्यात कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या मतांचा समावेश आहे. तसाच या दोघांच्या फुटलेल्या मतांच्या
बेरजेपेक्षाही अधिक मते मिळाल्याने मनसे व भाजपमधून काही मते त्यांना
पडली आहेत.

या निकालाने आघाडीत मोठी बिघाडी झाल्याचे स्पष्ट झाले.युतीचाही काहीसा
बेरंग झाला. त्यामुळेच राष्ट्रवादीचे भोसले प्रचंड मतांनी पहिल्याच फेरीत
विजयी झाले. युतीची 14 मते फुटली. ती सर्व पिंपरी-चिंचवडमधील आहेत, असा दाट संशय आहे. कारण येथील युतीतील दरी गेल्या पालिका पोटनिवडणुकीतून
रुंदावली गेली आहे. तर, कॉंग्रेसच्या उमेदवाराला जेवढी मते मिळाली (71)
त्यापेक्षा अधिक मते (80) त्यांची फुटली. त्यातून कॉंग्रेसमधील फूट केवढी
होती, याचा सहज अंदाज येतो. भाजप उमेदवाराने घोडेबाजार केला नाही, अन्यथा त्यांच्या मतांत आणखी वाढ झाली असती. तर आपला विजय नक्की असल्याचे माहीत
असूनही राष्ट्रवादी बेसावध राहिली नाही.उलट आपल्या मतांसह मोठ्या
संख्येने विरोधकांची मतेही त्यांनी खेचून आणली.

आगामी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत आघाडी न होण्यास आणखी एक कारण कॉंग्रेसला या निकालाने दिले. उद्योगनगरीतील कॉंग्रेसमधील बहुतांश नगरसेवक (13 पैकी 10) लवकरच राष्ट्रवादीत दाखल होणार असल्याचेही या निकालातून स्पष्ट झाले. शहरातील मनसेतील फूट आणि बेशिस्ही त्याने अधोरेखित केली. मतदानात भाग घ्यायचा नाही हा व्हिप शहरात मनसेच्या तीन नगरसेवकांनी धुडकाला. त्यातुलनेत या निवडणुकीत युती होण्याच्या शक्‍यतेला या निकालाने पाठबळ मिळाले आहे.
 
Web Title: powerful anil bhosale wins vidhan parishad