सर्वच पक्षांची जय्यत तयारी 

 सर्वच पक्षांची जय्यत तयारी 

पुणे - राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि कॉंग्रेसची ताकद असतानाही महापालिकेच्या गेल्या दोन निवडणुकांमध्ये शिवसेनेने मुसंडी मारल्याने या प्रभागात दोन्ही पक्षाने आता जोरदार तयारी केली आहे. विधानसभा निवडणुकीतील यशाने भारतीय जनता पक्षही आपले वर्चस्व वाढविण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे या पक्षातील इच्छुकांच्या नावांची यादी वाढत असून, त्या-त्या पक्षांमधील इच्छुकांमध्ये उमेदवारीसाठी लढत होण्याची शक्‍यता आहे. त्यात, या प्रभागातील बहुभाषिक मतदारांमुळे महापालिकेच्या निवडणुकीत येथील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

दुसरीकडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक फारुख इनामदार, कॉंग्रेसच्या विजया वाडकर, शिवसेनेचे माजी नगरसेवक नाना भानगिरे, तानाजी लोणकर याच प्रभागातून लढण्याची शक्‍यता असल्याने चुरस निर्माण होणार आहे. 

महापौर प्रशांत जगताप, नंदा लोणकर (प्रभाग क्रमांक 61), फारुख इनामदार, विजया वाडकर, योगेश टिळेकर आणि संगीता ठोसर यांच्या वॉर्डातील भाग एकत्र येऊन, नव्या रचनेत प्रभाग क्रमांक 26 म्हणजे, महंमदवाडी-कौसरबाग तयार झाला आहे. या प्रभागांमधील तीन नगरसेवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तर कॉंग्रेस, भाजप आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक नगरसेवक आहे. महंमदवाडी, कौसरबाग, सय्यदनगरचा काही भाग, चिंतामणीनगर, हांडेवाडी रस्ता, कोंढवा (खु), एनआयबीएम रस्ता, साळुंखे विहार या भागांचा यात समावेश आहे. या प्रभागात अनुसूचित जाती (महिला), नागरिकांचा मागास प्रवर्ग, खुल्या गटातील महिला आणि एक जागा खुल्या गटासाठी राखीव आहे. विशेष म्हणजे, या भागांमध्ये परप्रांतीय मतदारांची संख्या अधिक असल्याने प्रस्थापित राजकीय पक्षांना ही निवडणूक जड जाईल अशी चर्चा आहे. तर, नवी प्रभागरचना अनुकूल असल्याचा दावा करीत शिवसेना आणि भाजपने जोरदार तयार केली आहे. पारंपरिक मतदारांच्या जोरावर या दोन्ही पक्षांचे आव्हान मोडीत काढण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. विरोधकांना रोखण्यासाठी कॉंग्रेस या भागात जुळवाजुळव करीत आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या वाढली आहे. आपल्या बालेकिल्ल्यातील काही भाग नव्या प्रभागात आल्याने शिवसेनेकडून माजी आमदार महादेव बाबर यांचे चिरंजीव प्रसाद, पुतणे राजेंद्र यांच्यासह अनेकांनी तयारी केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसही तुल्यबळ उमेदवार देऊन शिवसेनेची कोंडी करण्याच्या प्रयत्नात आहे. 

नव्या प्रभागरचनेत टिकून आपल्या पक्षाचे बळ वाढविण्याच्या उद्देशाने राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरवात केली असून, अन्य पक्षांमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पक्षात घेण्याच्या दृष्टीने चाचपणी केली जात आहे. निवडणुकांच्या काळात या भागात पक्षांतर होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे उमेदवारांबाबत उत्सुकता आहे. सर्वच पक्षांमध्ये अनपेक्षित नावे ऐनवेळी चर्चेत येतील, असेही सांगण्यात येत आहे. 

प्रमुख इच्छुक उमेदवार 
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष : फारुख इनामदार, नंदा लोणकर, अतुल तरवडे, कलेश्‍वर घुले, 
कॉंग्रेस : विजया वाडकर, इरफान शेख, अमित घुले, अकबर शेख, जहीर शेख, अल्ताफ शेख, सुलतान खान 
भाजप : संजय घुले, सतपाल पारगे, संगीता लोणकर, प्रियांका साळवी, अनिता जगताप, जीवन जाधव, 
शिवसेना : नाना भानगिरे, तानाजी लोणकर, प्रसाद बाबर, जयसिंग भानगिरे, शाश्‍वत घुले, पूजा सचिन ननावरे, वैष्णवी घुले, शुभांगी घुले, सोनाली शेवाळे, 
आशा घुले, स्मिता शेवाळे, शैलजा भानगिरे, वत्सला घुले, संगीता आंबेकर, सुषमा जगताप, प्राची आल्हाट, अश्‍विनी सूर्यवंशी 
मनसे : साईनाथ बाबर, रोहन गायकवाड, सुप्रिया शिंदे, उज्ज्वला गायकवाड.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com