दोन विद्यमान नगरसेवकांची प्रतिष्ठा पणाला 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

प्रभागाच्या पुनर्रचनेमुळे यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. पूर्वीचा प्रभाग हा जनता वसाहतीपासून ते पर्वती गावापर्यंत पसरलेला होता. त्यात झोपडपट्टीप्रमाणेच काही पर्वती गावातील बैठी घरे, सोसायट्या आणि काही प्रमाणात बंगले असा संमिश्र मतदार होता. प्रभागाच्या पुनर्रचनेत जनता वसाहत आणि दत्तवाडी एकत्र केल्याने बहुतांश भाग हा झोपडपट्टीचा आला आहे. त्यामुळे या भागातील राजकीय समीकरणे बदलल्याचे दिसते. 

या प्रभागातील "अ' आणि "ड' गटातून कॉंग्रेस -राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात मैत्रिपूर्ण लढत होत आहे. उर्वरित "ब' आणि "क'मध्ये कॉंग्रेसने उमेदवारी दिलेली नाही. त्यामुळे या दोन प्रभागात कॉंग्रेसची पारंपरिक मते राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळावी, यासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत. या पार्श्‍वभूमीवर "मनसे'चे राहुल तुपेरे आणि मनसेतून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आलेल्या प्रिया गदादे या दोन्ही विद्यमान नगरसेवकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

या प्रभागातील "अ' गट हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. यातून सर्व प्रमुख पक्षांनी उमेदवारी दिली आहे. त्यात कॉंग्रेसचे शंकर ढावरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वैशाली चांदणे, भारतीय जनता पक्षाचे आनंद रिठे, शिवसेनेचे शिवाजी माने यांच्या विरुद्ध मनसेचे राहुल तुपेरे हे एकाकी लढत देत आहेत. मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असलेल्या "ब' गटात प्रिया गदादे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पुष्पमाला शिरवळकर या समोरा-समोर लढत आहेत. त्यामुळे या लढतीकडे लक्ष लागले आहे. महिला सर्वसाधारणसाठी राखीव असलेल्या "क' गटातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अर्चना हनमघर, भाजपच्या अनिता कदम आणि शिवसेनेच्या सुप्रिया कदम यांच्यात लढत होत आहे. "ड' हा गट खुला आहे. त्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप आणि शिवसेना या चारही प्रमुख पक्षांनी उमेदवार दिला आहे. त्यात विद्यमान नगरसेविका प्रिया गदादे यांचे बंधू प्रेमराज गदादे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. कॉंग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले माजी नगरसेवक शंकर पवार हेदेखील याच प्रभागातून निवडणूक लढवत आहेत. कॉंग्रेसने प्रवीण चव्हाण आणि शिवसेनेचे सूरज लोखंडे यांना या प्रभागातून उमेदवारी दिली आहे. 

Web Title: prabhag 30