आघाडीमुळे पुण्याचे वाटोळे - विनोद तावडे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

पुणे - ""टक्केवारीच्या राजकारणात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांनी पुण्याचे वाटोळे केले. त्या कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीला या वेळी हद्दपार केले पाहिजे,'' अशी टीका शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी केली. 

भाजपचे प्रभाग क्रमांक 31 (कर्वेनगर)चे उमेदवार सुशील मेंगडे, राजा बराटे, वृषाली चौधरी आणि रोहिणी भोसले यांच्या प्रचारासाठी आयोजिलेल्या सभेत तावडे बोलत होते. आमदार मेधा कुलकर्णी आणि चारही उमेदवार या वेळी उपस्थित होते. 

तावडे म्हणाले, ""कॉंग्रेस -राष्ट्रवादी कॉंग्रेस यांचे जाहीरनामे मी पाहिले. गेली 40 वर्षे सत्ता असलेल्या या पक्षांनी पुन्हा वाहतूक, पिण्याचे पाणी या समस्या सोडविण्याचे आश्‍वासन दिले. दरवेळी जातीय, भावनिक गणिते मांडायची आणि निवडून यायचे. खोटी आश्‍वासने का देता, असे मतदारांनी त्यांना विचारले पाहिजे. शरद पवार, अजित पवार यांनी बारामतीत जो विकास केला, तो जिल्ह्यातील अन्य तालुक्‍यांत, पुणे शहरात का केला नाही.'' 

""पुण्यात वाहतुकीची समस्या मोठी आहे. युती सरकार असताना पुण्यात उड्डाण पूल बांधतो, असे नितीन गडकरी यांनी सांगितले होते. त्यांनी मुंबईत 55 पूल बांधले. पुण्यात महापालिकेतील तत्कालीन कॉंग्रेसच्या सत्ताधाऱ्यांनी परवानगी दिली नाही. कारण, टक्केवारीचा प्रश्‍न आला असेल. टक्केवारीच्या राजकारणाने आघाडीतील पक्षांनी पुण्याचे वाटोळे केले. भाजप राज्यात सत्तेवर आल्यावर पीएमआरडीए, मेट्रो प्रकल्प, पाणीपुरवठा योजना मार्गी लावल्या. पुण्याच्या विकासासाठी, टक्केवारी नसलेली महापालिका निवडण्यासाठी भाजपला निवडून द्यावे,'' असे आवाहन तावडे यांनी केले.

Web Title: prabhag 31 pmc