उद्योग, शिक्षण, संशोधन संस्था आणि प्रशासनांची सांगड घालता आल्याचे समाधान !

Satisfaction with the integration of industry, education, research institutes and administration said Praveen Bhargav
Satisfaction with the integration of industry, education, research institutes and administration said Praveen Bhargav

पुणे : "प्रशासन, शिक्षण, संशोधन संस्था आणि उद्योग यांच्यात सांगड घालून क्रियाशीलतेसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देता आले. त्यातून उद्योग- विस्ताराच्या संधी निर्माण झाल्या. समाजाला त्याचा लाभ मिळाला पाहिजे, ही खूणगाठ कायम मनाशी बांधून गेले दोन वर्षे काम केले, त्याचे समाधान आहे,'' अशा शब्दात मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रिज अँड ऍग्रीकल्चरचे मावळते अध्यक्ष प्रदीप भार्गव यांनी सोमवारी भावना व्यक्त केल्या. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चेंबरच्या अध्यक्षपदाची भार्गव यांची दोन वर्षांची कारकिर्द 25 सप्टेंबर रोजी पूर्ण होत आहे. या पार्श्‍वभूमीवर साधलेल्या संवादात त्यांनी उद्योगांच्या संघटना केवळ त्यांच्या प्रश्‍नांबद्दल बोलतात, परंतु चेंबरच्या माध्यमातून मोठ्या संख्येने पुण्यात असलेले उद्योग, संशोधन, शैक्षणिक संस्था आणि प्रशासनाच्या सहकार्याने समाजासाठी सांगड घालू शकलो. त्यातूनच 'पुणे नॉलेज क्‍लस्टर' आकारास आले, असे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले, "समाजापासून उदयोग हा वेगळा घटक नाही. उद्योगांतून शहरावर काही प्रमाणात परिणाम होत असले तरी, शहराप्रती उद्योगांचीही जबाबदारी आहे. त्या जाणिवेतूनच चेंबर आणि आमचे सहकारी काम करीत आहेत. 

पुण्यासह सहा जिल्ह्यांना रेड अलर्ट राज्यात पुन्हा मॉन्सून सक्रिय

लघु व मध्यम उद्योगांच्या प्रश्‍नांची सोडवणूक करीत असतानाच कोरोनाच्या पूर्वीच्या काळात चेंबरने सुमारे 70 कोटी रुपयांची गुंतवणूक करून भोसरीत आता इलेट्रॉनिक क्‍लस्टरची उभारणी सुरू केली आहे. लवकरच ते पूर्ण होईल. त्याचा लहान-मोठ्या उद्योगांना मोठा फायदा होणार आहे. तसेच ऑटो क्‍लस्टरमध्येही सुधारणा केल्यामुळे त्याचे स्वरूप लोकाभिमुख झाले आहे. त्यामुळे उद्योगांचे परावलंबित्त्व काही प्रमाणात कमी झाले आहे, ही देखील माझ्यासाठी एक समाधानाची बाब आहे. 

कोरोनाच्या काळात उद्योगांचा मानवी चेहरा चेंबरच्या माध्यमातून पुढे आला. उद्योगांनी 12 कोटी रुपयांचा निधी उभारला. त्यातून व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन, एन-95 मास्क पुरविता आले. सामाजिक जबाबदारीच्या माध्यमातून चेंबर कायमच सक्रिय राहिले आहे. हा वसा आम्ही या वेळीही पुढे नेला. त्यातून खासगी, सार्वजनिक रुग्णालयांना मदत करता आली, असेही भार्गव यांनी नमूद केले. तसेच लॉकडाउनच्या काळात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, प्रशासनातील अधिकारी यांची सदस्यांसाठी सुमारे 150 वेबिनार आयोजित करण्यात आले होते, असेही त्यांनी सांगितले. 

यंदा नवरात्र उत्सवात रास-दांडिया नाहीच; तरुण-तरुणींच्या आनंदावर फेरले पाणी​

उद्योगांचे आयातीवरील परावलंबित्त्व कमी करण्यासाठी खूप काही करण्याचे मनात होते. परंतु, कोरोनामुळे काही मर्यादा आल्या. परंतु, आपल्या उद्योगांत क्षमता आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ते स्पर्धा करू शकतात. यासाठी स्थानिक स्तरावर एकत्र येऊन सक्षम होणे गरजेचे आहे. तसेच या मध्ये राज्य सरकारच्या स्तरावरही सुधारणांना मोठ्या स्तरावर वाव आहे. त्यासाठी पुढील काळात ठोस पावले उचलता आली तर, स्थानिक उद्योगांना मोठ्या संधी आहेत, असेही मत भार्गव यांनी व्यक्त केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com