प्राधिकरणात ३८४ सदनिका, १६ रोहाउस

आकुर्डी - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची इमारत.
आकुर्डी - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची इमारत.

पिंपरी - प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक सहामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटासाठी ३८४ सदनिका आणि उच्च उत्पन्न गटासाठी १६ रो-हाउसचे नियोजन आहे. नागरिकांच्या विरोधामुळे प्रकल्पाचे थंडावलेले काम पूर्ववत सुरू करण्यासाठी प्राधिकरण प्रशासन तोडगा काढणार आहे. त्यासाठी आकुर्डी येथील प्राधिकरण कार्यालयात सोमवारी (ता. ११) सकाळी ११ वाजता नागरिकांची बैठक होणार आहे.

प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद यादव या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. प्राधिकरणाच्या प्रकल्पामुळे नागरी समस्यांमध्ये आणखी भर पडणार असल्याने हा प्रकल्प अन्यत्र हलवावा, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे. या प्रकल्पात पाच हजार ६३६ चौरस मीटर जागेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी २६० सदनिका व क्‍लब हाउस होणार आहे. त्यासाठी २६ कोटी २७ लाख रुपयांची निविदा रक्कम मंजूर आहे. याच प्रकल्पात ७ हजार ८८८ चौरस मीटर जागेत अल्प उत्पन्न गटासाठी १२४ सदनिका व क्‍लब हाउस साकारणार आहे, त्यासाठी २३ कोटी ७९ लाख एवढा खर्च अपेक्षित आहे. या दोन्ही कामांसाठी आदेश दिले आहेत.

तसेच, पेठ क्रमांक सहामध्ये तीन हजार २२९ चौरस मीटर जागेत १६ रोहाउस उभारण्याचे नियोजन आहे. प्रत्येक रोहाउसचे बिल्टअप क्षेत्र एक हजार ८०० चौरस फूट असणार आहे. त्याची निविदा प्रक्रिया सध्या सुरू आहे. संबंधित कामासाठी नऊ कोटी ९९ लाख खर्च अपेक्षित आहे.

पेठ क्रमांक सहामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटासाठी साकारणाऱ्या ३८४ सदनिकांचे काम दोन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. उच्च उत्पन्न गटासाठी रो-हाउस उभारण्याच्या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे.
- एस. पी. खलाटे, कार्यकारी अभियंता, प्राधिकरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com