राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी प्रदीप गारटकर

जनार्दन दांडगे
गुरुवार, 14 जून 2018

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी इंदापूरचे प्रदिप गारटकर यांची निवड करण्यात आली आहे. तर सोलापूर ग्रामीणच्या अध्यक्षपदी दिलीपआबा साळुंखे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सन २०१८ ते २०२० या कालावधीसाठी महाराष्ट्र प्रदेश पक्षांतर्गत २४ जिल्ह्यांच्या जिल्हाध्यक्षांची निवडणूक नुकतीच पार पडली. तसेच उर्वरीत जिल्हाध्यक्षांची निवड लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

लोणी काळभोर(पुणे) - राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी इंदापूरचे प्रदिप गारटकर यांची निवड करण्यात आली आहे. तर सोलापूर ग्रामीणच्या अध्यक्षपदी दिलीपआबा साळुंखे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सन २०१८ ते २०२० या कालावधीसाठी महाराष्ट्र प्रदेश पक्षांतर्गत २४ जिल्ह्यांच्या जिल्हाध्यक्षांची निवडणूक नुकतीच पार पडली. तसेच उर्वरीत जिल्हाध्यक्षांची निवड लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

निवडणुकीमध्ये निवडण्यात आलेले जिल्हाध्यक्ष व कंसामध्ये निवडून आलेल्या जिल्ह्याचे नावे आहेत. बाबाजी गोपाळराव जाधव (रत्नागिरी), प्रमोद घोसाळकर (रायगड), अनंत लक्ष्मण सुतार (नवी मुंबई), प्रकाश शंकर दुबोले (मिरा भाईंदर), सुनिल भुसारा (पालघर), प्रदिप गारटकर (पुणे ग्रामीण), सुनील गुलाबराव माने (सातारा), विलासराव शिंदे (सांगली ग्रामीण), दिपकआबा साळुंखे (सोलापूर ग्रामीण), मनोज दादासाहेब मोरे (धुळे शहर), किरण एकनाथ शिंदे (धुळे ग्रामीण), राजेंद्र गावीत (नंदुरबार), डॉ. निसार अहमद देशमुख (जालना), राणा जगजितसिंग पाटील (उस्मानाबाद), मकरंद भालचंद्र (लातूर शहर), बाबासाहेब पाटील (लातूर ग्रामीण), अॅड. नाझीर हुसेन काझी (बुलढाणा), राजकुमार दिपचंद मुलचंदानी (अकोला शहर), राजेंद्र महल्ले (अमरावती शहर), सुनिल वऱ्हाडे (अमरावती ग्रामीण), सुनिल राऊत (वर्धा), अनिल अहिरकर (नागपूर शहर), नाना पंचबुद्धे (भंडारा), पंचम बिसेन (गोंदिया).

Web Title: pradip garatkar selected as a district President of pune rural National Congress Party