राजकीय जीवनात विकासकामांनाच महत्त्व: प्रदीप वळसे पाटील

युनूस तांबोळी
शुक्रवार, 22 जून 2018

शिरूरमधील 39 गावांतील कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा

शिरूरमधील 39 गावांतील कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा

टाकळी हाजी (पुणे) राजकीय जीवनात पदापेक्षा सर्वसामान्यांच्या विकासकामांना महत्त्व दिले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून काम करत असताना कार्यकर्ता म्हणून कोणाकडे न पाहता मित्र म्हणूनच पाहिले. त्यातून विविध क्षेत्रांतील मित्र जोडले गेल्याची भावना भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली.
 
पारगाव दत्तात्रेय नगर (ता. आंबेगाव) भीमाशंकर साखर कारखाना येथे प्रदीप वळसे पाटील यांच्या 38 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी जमलेल्या शिरूरच्या 39 गावांतील तरुण कार्यकर्त्यांसमोर ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, सभापती सुभाष उमाप, माजी सभापती प्रकाश पवार, घोडगंगेचे संचालक राजेंद्र गावडे, जिल्हा परिषद सदस्या सुनीता गावडे, आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अनिल वाळुंज, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष बाळासाहेब भोर, भीमाशंकर कारखान्याचे संचालक माउली गावडे, बाळासाहेब घुले, शांताराम हिंगे, बाबासाहेब खालकर, रामचंद्र ढोबळे, भीमाशंकर कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, भीमाशंकर शिक्षण संस्थेचे बी. डी. चव्हाण, सरपंच दामू घोडे, मल्हारी मलगुंडे, वसंत पडवळ, योगेश थोरात, मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष भास्कर पुंडे आदी उपस्थित होते.

उमाप म्हणाले, "समाजात काम करत असताना विकासाची दिशा ठरवली की आपोआपच यश मिळते. दिलदार, लीनता असे पक्षाच्या हिताचे नेतृत्व असल्याने 39 गावांतील तरुणाई त्यांच्याकडे आकर्षित झाली आहे. भविष्यात असेच नेतृत्व संपन्न गुण त्यांच्यात तयार व्हावेत.''

या वेळी भीमाशंकर कारखान्याच्या क्षेत्रात वृक्षारोपण करण्यात आले. सूत्रसंचालन माजी उपसरपंच नरेश ढोमे यांनी केले. सरपंच दशरथ फंड यांनी आभार मानले.

Web Title: pradip walse patil political life and social work