पिंपळे गुरवमध्ये प्राज्ञजन परिषद संपन्न

sanghvi
sanghvi

जुनी सांगवी - आज काही शक्ती संविधान नाकारण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न करीत आहेत. त्यांना येथे विषमतेवर आधारीत व्यवस्था निर्माण करावयाची आहे. जातीव्यवस्था टिकविण्याचे कटकारस्थान सध्या सुरु आहे. माणसाचे माणूसपण जपणे आणि माणुसकी समृद्ध करणे ही आपली जबाबदारी आहे. गौतम बुद्ध, भगवान महावीर, संत कबीर, फुले-शाहू-आंबेडकर आदी महामानवाची आदर्श शिकवण आपण स्वीकारली तरच देशाचा पर्यायाने मानवतेचा विकास साध्य होईल, असे प्रतिपादन नागपूर येथील भंते विमलकित्ती गुणसिरी यांनी पिंपळे गुरव येथे प्राज्ञजन परिषदेत व्यक्त केले.

येथील नटसम्राट निळू फुले सभागृहात एक दिवसीय प्राज्ञजन परिषदेचे आयोजनडॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सव संयुक्त जयंती समिती गुरुशोभा सामाजिक व क्रीडा संस्थेच्या सौजन्याने ४२ संस्था, बचतगट, सेवा संघ, बुद्ध विहार यांच्या सहयोगाने करण्यात आले होते. याप्रसंगी कार्याध्यक्षा सुजाता निकाळजे,  अ‍ॅड. राजेश नितनवरे, माजी अध्यक्ष अमरसिंग आदियाल, माजी कार्याध्यक्ष राहुल काकडे, नगरसेवक अंबरनाथ कांबळे, संदिप खुंटे, विजय चौधरी, चंद्रकांत वाकोडे, डॉ. शशिकांत वग्गे, सी.आर. गायकवाड, अ‍ॅड. विलास गायकवाड, पंकज कांबळे, महेंद्र कदम, नयन आहिरे, अरविंद कसबे, विनायक जाधव, जी.आर.कांबळे, विलास भालेराव, सुशिला काकडे, इंदुमती पवार आदी उपस्थित होते. यावेळी परिसरातील उपासक अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पहिल्या सत्रात त्रिसारण पंचशील आणि दीपप्रज्ज्वलन झाल्यानंतर भंते विमल कित्ती गुणसिरी यांनी उपासकांना मार्गदर्शन केले. दुसर्‍या सत्रात शिबिरार्थी संवाद आणि भविष्यातील कार्यक्रमाचे नियोजन आणि तिसर्‍या सत्रात शिबिराचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक राहुल काकडे यांनी केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com