esakal | उपमुख्यमंत्र्यांनी कुठल्या अधिकाराखाली असं वक्तव्य केलं; आंबेडकरांचा सवाल

बोलून बातमी शोधा

prakash ambedkar ajit pawar

उपमुख्यमंत्र्यांनी कुठल्या अधिकाराखाली असं वक्तव्य केलं; आंबेडकरांचा सवाल

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे- राज्यात कोरोना परिस्थिती गंभीर बनत असताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बोचरी टीका केली आहे. अजित पवार डिफॅक्ट मंत्री असल्याचं ते म्हणाले आहेत. अजित पवारांनी रेमडेसिव्हिर राज्य शासन इम्पोर्ट करणार असल्याचे सांगितले. पण शासनाला तसे अधिकार नाहीत, त्यामुळे अजित पवारांनी कुठल्या अधिकाराखाली असे वक्तव्य केलं, असा सवालही आंबेडकर यांनी केला आहे.

जागतिक आरोग्य संघटना (WHO) वारंवार दुसऱ्या लाटेबद्दल वॉर्निंग देत होती. तसेच, 11 नोव्हेंबर 2020 रोजी आरोग्य विभागाच्या वतीने दुसऱ्या लाटेबद्दल सांगण्यात आले होते. कोरोना काळात उभारण्यात आलेले इन्फ्रास्ट्रक्चर रद्द करु नये, असं सांगण्यात आलं. पण, राज्य शासनाने एक्स्पर्ट टीमचा सल्ला मानला नाही. राज्य सरकार स्वतः तज्ञ असल्याचं मानू लागलं. आता परिस्थिती अशी आहे की ऑक्सिजन कमी पडताहेत, बेड्स कमी पडताहेत, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.

हेही वाचा: बारामतीकरांसाठी दिलासादायक बातमी; अजित पवारांकडून दहा व्हेंटिलेटर्स

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. दिवसाला 60 हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहे. शिवाय राज्यात आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत आहे. यापार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. कोरोना काळात मुख्यमंत्री कुठेही दिसत नाहीत, ते कुणाशीही चर्चा करत नाहीत. उलट उपमुख्यमंत्री अजित पवार सर्वांशी चर्चा करत आहेत. त्यामुळे अजित पवार हेच मुख्यमंत्री वाटतात, असं ते म्हणाले.

हेही वाचा: 'अजित पवार 24 तासांपासून नेटवर्क कव्हरेजच्या बाहेर'

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने लशीचे दर निश्चित केले आहेत. पण, इतर देशांना लस स्वस्तात मिळत असून भारताला ती जवळपास 1200 रुपयांना मिळत आहे. सीरमची ही लस सर्वांना 150 रुपयांना मिळावी. याबाबत निर्णय जाहीर करावा, अन्यथा आठवड्यानंतर जिल्ह्याच्या ठिकाणी आंदोलन करु, अशा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.