प्रकाश आंबेडकरांची चौकशी का नाही?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

माओवादी संघटनांशी संबंध प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांत पोलिसांना काही टोपणनावे पुढे आली. त्यानुसार पोलिसांनी कॉम्रेड एम हे मिलिंद तेलतुंबडे, कॉम्रेड रोना हे रोना विल्सन असल्याचा अर्थ काढला.

काही पत्रांत कॉम्रेड प्रकाश आंबेडकर असा स्पष्ट उल्लेख आहे. मग पोलिसांनी त्यांची चौकशी का केली नाही, असा सवाल बचाव पक्षाच्या वतीने ॲड. रोहन नहार यांनी केला.

पुणे - माओवादी संघटनांशी संबंध प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांत पोलिसांना काही टोपणनावे पुढे आली. त्यानुसार पोलिसांनी कॉम्रेड एम हे मिलिंद तेलतुंबडे, कॉम्रेड रोना हे रोना विल्सन असल्याचा अर्थ काढला.

काही पत्रांत कॉम्रेड प्रकाश आंबेडकर असा स्पष्ट उल्लेख आहे. मग पोलिसांनी त्यांची चौकशी का केली नाही, असा सवाल बचाव पक्षाच्या वतीने ॲड. रोहन नहार यांनी केला.

सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांच्या जामिनावर सुनावणी सुरू आहे. या वेळी वरवरा राव आणि रोना विल्सन यांच्या वतीने ॲड. नहार यांनी बाजू मांडली. पोलिसांनी अनेक कागदपत्रे जप्त केली आहेत. त्यात पत्र पाठविणारा आणि ज्याला पाठविले हे अनोळखी आहेत. अटक करण्यात आलेले आणि पत्रात टोपणनाव असणारे एकच आहेत, असा एकही पुरावा नाही. इंडियन असोसिएशन पीपल्स लॉयर्स (आयएपीएल) ही सीपीआय (एम)ची फ्रंट ऑर्गनायझेशन असल्याचे पोलिस सांगतात. मात्र, त्यावर सरकारने बंदी घातलेली नसल्याचे ॲड. नहार यांनी न्यायालयास सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prakash Ambedkar Inquiry