शिवसेनेने प्रश्न उपस्थित न केल्यास केंद्राची मनमानी : आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 25 January 2020

शरद पवार हे सर्व उघड करत आहेत, त्यांचे आम्ही स्वागत करतो. स्वतःची चमडी वाचविण्यासाठी केंद्राकडून प्रयत्न केले जात आहेत. जे या प्रकरणाशी संबंधित नाहीत, ते कारागृहात सडत राहणार का? या प्रकरणाची अर्धी कागदपत्रे न्यायालयात आहेत.

पुणे : केंद्र सरकारने कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गैरविश्वास दाखविला आहे. आता शिवसेनेने केंद्राकडे प्रश्न उपस्थित न केल्यास केंद्र सरकार मनमानी करेल, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरेगाव-भीमा प्रकरणाची विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी) चौकशी करण्याची मागणी राज्यामध्ये जोर धरत असतानाच केंद्र सरकारने अचानक तडकाफडकी निर्णय घेत हे प्रकरण राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) वर्ग केले. हे करण्याआधी महाराष्ट्र सरकारला विश्‍वासात घेण्यात आले नाही. यामुळे सरकारच्या निर्णयावर टीका होत आहे.

केंद्राच्या निर्णयावर संशय, सत्य बाहेर येईल या भीतीमुळे : शरद पवार

एका वृत्तवाहिनीशी बोलताना आंबेडकर म्हणाले, की शरद पवार हे सर्व उघड करत आहेत, त्यांचे आम्ही स्वागत करतो. स्वतःची चमडी वाचविण्यासाठी केंद्राकडून प्रयत्न केले जात आहेत. जे या प्रकरणाशी संबंधित नाहीत, ते कारागृहात सडत राहणार का? या प्रकरणाची अर्धी कागदपत्रे न्यायालयात आहेत. मुख्यमंत्र्यांवर केंद्राकडून गैरविश्वास दाखविण्यात आला. दोन यंत्रणांच्या भांडणात ज्यांना आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे, त्यांचे काय होणार?

कोरेगाव-भीमाप्रकरणी केंद्राचा तडकाफडकी निर्णय; तपास ‘एनआयए’कडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prakash Ambedkar targets government on Koregaon Bhima issue