Loksabha 2019 : प्रकाश जावडेकर यांची मंगळवारी जाहीर सभा

prakash_javdekar_2.jpg
prakash_javdekar_2.jpg

पुणे : पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-आरपीआय-शिवसंग्राम-रासप महायुतीचे अधिकृत उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांची उद्या (२६ मार्च) सायंकाळी साडेपाच वाजता कोथरूड येथील शिक्षक नगर सोसायटीच्या मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. 

शिवसेनेच्या उपनेत्या आमदार डॉ. नीलम गोर्‍हे, खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय काकडे, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार प्रा. मेधा कुलकर्णी, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, संघटन सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, शिवसेनेचे शहरप्रमुख चंद्रकांत मोकाटे, आरपीआयचे शहर अध्यक्ष अशोक कांबळे, शिवसंग्रामचे अध्यक्ष भरत लगड, रासपचे अध्यक्ष सनी रायकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com