प्रमिला आजींच्या कुटुंबाची "लिम्का'त भरारी 

pramiladevi hote
pramiladevi hote

पुणे - "छोट्या कुटुंबा'च्या आजच्या जमान्यात 94 वर्षांच्या प्रमिलादेवी होटे या आजीबाईंची कहाणी तशी विरळाच. 6 मुली, 4 मुलगे, 28 नातवंडं आणि 32 पणतू... अशा गोकुळाची "समृद्धी' प्रमिला आजींकडे आहे. इतक्‍या, सगळ्या नातवंडं-पतवंडांच्या सहवासातल्या या आजी आजही तितक्‍याच ठणठणीत आहेत. त्यांच्या या विस्तारित कुटुंबाच्या कहाणीनं नुकतंच "लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'चंही लक्ष वेधून घेतलं! त्यात नोंदही झाली. 
प्रमिला आजी मूळच्या वर्ध्याच्या. दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर साधारणत: 1942 च्या सुमारास त्याचं लग्न झालं. पती यादवराव होटे हे शिक्षक असल्याने लग्नानंतर त्या, काही वर्षे वर्ध्यात राहिल्या. पुढे मुला-मुलींच्या नोकरीनिमित्त 1994 मध्ये पुण्यात आल्या. त्यांची थोरली मुलगी 72 वर्षांची, तर लहान मुलगी 53 वर्षांची आहे. सध्या त्या जगदीश यांच्यासह बावधन परिसरात राहतात. जगदीश यांचं चौघांचं कुटुंब आहे. अन्य तीन मुली पुण्यातच राहतात, तर इतर सहा मुलं-मुली नागपूर, ठाणे शहरांत वास्तव्यास आहेत. 

पाच नातवंड, अमेरिकेसह अन्य देशांत नोकरीनिमित्त आहेत. गेल्या दहा-बारा वर्षांपासून पतवंडांच्या संगोपनाची जबाबदारी त्यांच्यावर असून, आजतागायत ती त्या सांभाळत आहेत. एवढेच नव्हे, तर रोज दैनिकांबरोबरच साहित्याचं वाचन करणे हा त्यांचा छंद आहे. गेल्या पाच-सहा वर्षांत थकल्या असल्या तरी रोज नित्यनियमाने सकाळी त्या फिरायला जातात. सायंकाळीही पतवंडांना घेऊन फिरायला जातात. सणासुदीच्या काळात (दिवाळी) त्या गोतावळ्यात असतात. 94 वर्षांच्या आपल्या आजीला भेटायला नातवंडं आणि पतवंडे आर्वजून येतात. डिसेंबर महिन्यात ते एकत्र येतात. 

नातवंडं आणि पतवंडांच्या गोतावळ्यात प्रमिला आजी अजूनही सगळी मुले, मुली आणि जावईबापूंची काळजी घेतात. दर दोन-चार दिवसांत प्रत्येकाची विचारपूस करण्याबरोबरच त्यांच्या अडीअडचणीत मदत करीत असतात. कुटुंबांमध्ये जिव्हाळा राहावा, तो टिकावा, यासाठी प्रमिला आजी नेहमीच प्रयत्न करीत असतात. प्रमिला आजींच्या कुटुंबातील गोकुळाच्या "समृद्धी'ची "लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद झाली. त्यामुळे या प्रमिला आजी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा आनंद ऐन दिवाळीत द्विगुणित झालाच आहे, दिवाळीतल्या दिव्यांमध्ये तर अधिक उजाळून निघतो. 

प्रमिला आजींचे पुण्यातील जावई (नात) सुधीर नागे म्हणतात, ""माझ्या सासूबाई अर्थात, प्रमिला होटे यांची देशपातळीवर नोंद घेतल्याने कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आम्हा सर्वांसाठी त्या मोठा आधार आहेत. कौटुंबिक अडचणींसह वेगवेगळ्या विषयांत त्याचे मार्गदर्शन मिळते.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com