पुणे जिल्हा परिषदेचे सभापती ठरले; पाहा कोणाच्या गळ्यात पडली माळ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत असल्याने या चौघांच्या नावांची केवळ औपचारिक घोषणा होणे बाकी राहिले आहे. याबाबतची अधिकृत घोषणा आज (ता. 24) दुपारी तीन वाजता केली जाणार आहे.                    

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतीपदी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामतीचे प्रमोद काकडे, मावळचे अपक्ष परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे सहयोगी सदस्य बाबूराव वायकर, हवेलीच्या पुजा पारगे आणि दौंडच्या सारिका पानसरे यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

Image
प्रमोद काकडे

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Image
बाबूराव वायकर 

पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत असल्याने या चौघांच्या नावांची केवळ औपचारिक घोषणा होणे बाकी राहिले आहे. याबाबतची अधिकृत घोषणा आज (ता. 24) दुपारी तीन वाजता केली जाणार आहे.

Image
पूजा पारगे

आणखी वाचा - म्हणून, रायगड जिल्ह्यात वाढलंय मुलींचं प्रमाण

Image
सारीका पानसरे

नवे बांधकाम सभापती काकडे हे बारामती तालुक्यातील करंजेपूल-निंबूत, वायकर हे मावळ तालुक्यातील वडगाव-खडकाळा, पारगे या हवेली तालुक्यातील मांगडेवाडी-डोणजे आणि पानसरे या दौंड तालुक्यातील लिंगाळी-मलठण या जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले आहेत. नव्या चार सभापतींपैकी काकडे हे सलग दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेवर निवडून आलेले आहेत. वायकर, पारगे आणि पानसरे हे पहिल्यांदाच जिल्हा परिषदेवर निवडून आलेले आहेत. मात्र पारगे यांचे पती नवनाथ पारगे हे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pramod Kakade elected as a chairman of Pune zp