शंभर दिवसांत 10 हजार किलोमीटर (व्हिडिओ)

बारामती ः सांगलीच्या प्रमोद महाजन यांचे स्वागत करताना (डावीकडून दुसरे) डॉ. आर. डी. वाबळे, (पहिले) योगेश तावरे व मान्यवर.
बारामती ः सांगलीच्या प्रमोद महाजन यांचे स्वागत करताना (डावीकडून दुसरे) डॉ. आर. डी. वाबळे, (पहिले) योगेश तावरे व मान्यवर.

बारामती (पुणे): अठरा वर्षांपूर्वी स्वखर्चाने दवाखान्यात जाऊन मित्राला किडनी दान केलेल्या सांगली जिल्ह्यातील 67 वर्षीय प्रमोद महाजन यांनी अवयवदान जागृतीसाठी सुरू केलेली भारत परिभ्रमण यात्रा शुक्रवारी 100 दिवसांनी पूर्ण केली. त्यांनी 18 राज्यांमध्ये मिळून 10 हजार किलोमीटरचा प्रवास दुचाकीवर केला.

येथील भाग्यजय चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने डॉ. आर. डी. वाबळे, डॉ. स्वाती वाबळे यांनी महाजन यांचे बारामतीत स्वागत केले. या वेळी योगेश तावरे, डॉ. मिलिंद ठोंबरे, डॉ. गणेश पन्हाळे, डॉ. मारुती कांबळे, डॉ. प्रियांका निंबाळकर, डॉ. श्रद्धा वाबळे, डॉ. मनीष माळी उपस्थित होते.

महाजन यांनी 18 ऑक्‍टोबर रोजी सांगली येथून या भारत भ्रमण यात्रेस सुरवात केली होती. मुक्काम असेल तिथे वैद्यकीय महाविद्यालय, महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधत अवयवदानाचे महत्त्व त्यांना पटवून देण्याचे काम महाजन यांनी केले. ते शुक्रवारी बारामतीत पत्रकारांशी बोलताना या प्रवासाविषयी सांगत होते. ते म्हणाले, ""अठरा वर्षांपूर्वी भारतीय सैन्यदलात नियुक्तीस असलेल्या सैनिक मित्रास किडनी दान केली. त्या वेळी मला लोकांनी, नातेवाइकांनी वेड्यात काढले, मात्र त्यानंतर समाज जागृतीस सुरवात केली. गेली पंधरा-सोळा वर्षे मी सातत्याने अवयवदानाबाबत जागृती करीत आहे. भारतातील बहुतेक राज्यांमध्ये माझ्या या उपक्रमाचे स्वागत झाले. यापुढेही जोपर्यंत आयुष्य साथ देत आहे, तोवर अवयवदानाचीच जागृती करणार आहे.''

स्वयंप्रेरणेने काम कौतुकास्पद ः वाबळे
भाग्यजय ट्रस्टच्या वतीने डॉ. आर. डी. वाबळे म्हणाले, ""सध्या नेत्रदानाविषयी जागृती चांगली झाली आहे, मात्र अलीकडच्या काळात किडनीबरोबरच लिव्हर ट्रान्सप्लांट, हार्ट ट्रान्सप्लांट वाढत आहेत. पूर्वी केवळ चेन्नईमध्ये असलेली अवयव प्रत्यारोपणाची सुविधा आता पुण्यासारख्या शहरांतही सुरू झाली असल्याने समाजात जनजागृतीची गरज आहे. महाजन यांच्यासारख्या व्यक्ती स्वयंप्रेरणेने हे काम करू लागले आहेत हे अत्यंत कौतुकास्पद आहे.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com