मनाचिये वारी : आध्यात्मिक साधनेने व्हा विठ्ठलाशी एकरूप

amlnerkar maharaj.jpg
amlnerkar maharaj.jpg

पंढरीची वारी आहे माझे घरी।
आणिक न करी तीर्थव्रत।।

पंढरीची वारी ही वारकरी संप्रदायातील सर्वश्रेष्ठ साधना आहे. आपल्या आराध्य दैवताच्या भेटीसाठी त्याचे गुणगान गात पंढरपूरला जाणे म्हणजे वारी. या काळात सकल इंद्रियांवर विजय मिळविणे शक्‍य असते. वारीत वारकऱ्यांना कितीही मोठी अडचण आली तरी ती सहजपणे सुटते. वारीचे वेध दोन महिने अगोदरच लागतात. एखाद्या सासूरवाशिणीला माहेरला जाण्याची ओढ लागली, की तिचे चित्त जसे माहेरच्या वाटेकडे लागते, अगदी तशीच अवस्था वारकऱ्यांची होऊन जाते. पंढरपूर हे महापीठ आहे, त्यामुळे आषाढी वारीला सर्व भागांतून भाविक येतात. कोणतेही निमंत्रण नसताना अगदी योग्य वेळी लाखो भाविक पायी वारीत सहभागी होतात, संतांच्या संगतीचा आनंद उपभोगत वारी पूर्ण करतात. वारीत चालताना मिळणारा नामस्मरणाचा आनंद काही निराळाच...! तो शब्दांत बंदिस्त करता येत नाही, तो प्रत्येकाने स्वानुभवातूनच घ्यावा. प्रत्येकाच्या आनंदाची परिभाषा निराळी असते.

Wari 2020 : यंदा कोरोनामुळे सर्वच धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध आले आहेत, त्यात वारीही वेगळी राहिलेली नाही. सरकारने पायी वारीला बंदी घातली. या निर्णयाने लाखो वारकऱ्यांच्या मनाची झालेली अवस्था त्यांची त्यांनाच माहीत. पण याला कोणीच जबाबदार नाही. सरकारही नागरिकांच्या काळजीपोटीच हे सारे निर्बंध घालत आहे, त्यामध्ये त्यांचा कोणताही स्वार्थ नाही. त्यांनी परवानगी दिली, तर या साथीचे गंभीर परिणाम राज्याला भोगावे लागतील, त्यात वारकरी संप्रदायही दोषी ठरेल. त्यापेक्षा वारकऱ्यांनी घरीच राहून विठ्ठलभक्ती करावी. एकादशीला गावातील विठ्ठल मंदिरात किंवा घरातील विठ्ठलमूर्तीला मनोमन नमस्कार करावा. हरिपाठ, गाथा, भजन करावे. ग्रंथांचे वाचन करावे. घरीच वारीच्या आठवणींत, आध्यात्मिक साधनेत वेळ घालवावा म्हणजे वारी चुकली, असे म्हणता येणार नाही. विठ्ठलाशी एकरूप राहणे, हीच आहे खरी वारी...!
(शब्दांकन : शंकर टेमघरे)

""सोपानदेवांच्या समाधी स्थानामुळे सासवड ही आध्यात्मिकनगरी आहे. माउलींच्या पालखी सोहळ्याचे आगमन हा सासवडवासीयांचा आनंदाचा दिवस असतो. संतांच्या नगरीत संतांचे होणारे आगमन निश्‍चित चैतन्यदायी असते. कोरोनामुळे यंदा हा योग चुकला आहे, त्यामुळे पुढच्या वारीची आस आतापासूनच लागली आहे.''
- नारायण गोसावी, सासवड
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com