ग्रुप एम इंडियाच्या सीओओपदी प्रसंथ कुमार

ग्रुप एम इंडियाच्या सीओओपदी प्रसंथ कुमार

पुणे - ग्रुप एम आणि माईंड शेअर कंपनीच्या (दक्षिण आशिया) चीफ ऑपरेटिंग ऑफिसरपदी (सीओओ) प्रसंथ कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तुषार व्यास यांची ग्रोथ ॲण्ड ट्रान्सफॉर्मेशन अध्यक्ष, तर पार्थसारथी मंडायम  यांची माईंडशेअरच्या दक्षिण आशिया विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) नियुक्ती करण्यात आली आहे. अमिन लखानी यांची माईंडशेअरच्या (दक्षिण आशिया) चीफ ऑपरेटिंग ऑफिसरपदी (सीईओ) नियुक्ती झाली आहे. 

कंपनीच्या ग्राहकांच्या अपेक्षा आणि विश्‍वास यासाठी प्रसंथ कुमार काम करतील. तसेच, व्यापार आणि विशेष विभाग सांभाळण्याच्या नवीन भूमिकेत ते असणार आहे. कंपनी डिजिटल बदल, डिजिटल डेटा, ॲनालिटिक्‍स यावर भर देणार आहे. नवीन नियुक्‍त्यांबद्दल बोलताना ग्रुप एम दक्षिण आशियाचे ‘सीईओ’ सॅम सिंह या म्हणाले, की कुमार आणि तुषार या आव्हानाला यशस्वीपणे सामोरे जातील. त्यांच्यामध्ये योग्य क्षमता आहे. कंपनी अधिक माहितीकेंद्रित बनत असल्याने डिजिटल, डेटा, ॲनालिटिक्‍सवर लक्ष देणार आहोत. संस्थात्मक परिवर्तनासाठी आम्ही कंपनीमध्ये फेरबदल केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com