वांजळे, फुगे यांच्यानंतर पुण्यात नवा 'गोल्डमॅन'

वांजळे, फुगे यांच्यानंतर पुण्यात नवा 'गोल्डमॅन'

पुणे : मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे, व्यावसायिक दत्ता फुगे यांच्यासारखे 'गोल्डमॅन' आत्तापर्यंत पुण्यात होते. त्यानंतर आता नवा 'गोल्डमॅन' पुण्यात आला आहे. त्यांचे नाव आहे प्रशांत सपकाळ. प्रशांत सपकाळ तब्बल पाच किलो वजनाचे सोने परिधान करून दररोज वावरत आहेत. त्यांच्या सोन्याची चर्चा सगळीकडे आता सुरु आहे.

पुण्यातील मध्यमवर्गीय कुटुंबात प्रशांत यांचा जन्म झाला. त्यानंतर त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला. त्यातच त्यांना सोन्याची पहिल्यापासून आवड होती. प्रशांत दररोज सोन्याची चैन, लॉकेट, ब्रेसलेटच्या स्वरूपात एकूण पाच किलो सोने अंगावर परिधान करतात. याची किंमत आहे तब्बल दीड कोटी रुपये. प्रशांत यांना सोन्याची आवड आहे. स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रशांत यांनी भरपूर कष्ट घेतले. आता ते पुण्यातील गोल्डमॅन म्हणून प्रसिद्ध होत आहे.  

प्रशांत सपकाळ सामाजिक कार्यातही मोठा हातभार लावत आहेत. त्यांनी आत्तापर्यंत काही गोरगरिबांना मदतही केली आहे. 

बप्पी लहरी यांच्याकडून प्रेरणा

बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार बप्पी लहरी सोने परिधान करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्याकडूनच प्रेरणा घेत प्रशांत यांनी इतक्या वजनाचे सोने परिधान केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com