esakal | पुणे : बारामतीतील 'त्या' पोलिसांची चौकशी करा; कोणी केली मागणी?
sakal

बोलून बातमी शोधा

Police

दोन प्रकरणात उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर हेही सामील असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

पुणे : बारामतीतील 'त्या' पोलिसांची चौकशी करा; कोणी केली मागणी?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बारामती (पुणे) : येथील शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील आणि त्यांच्या काही सहकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करुन त्यांची बदली करावी, अशी मागणी कारभारी अण्णा चॅरिटेबल फाऊंडेशनचे सचिव प्रशांत नाना सातव यांनी केली आहे.

- सोसायटीत येणारी व्यक्ती कंटेनमेंट झोनमधील तर नाही ना? सॉफ्टवेअर देणार माहिती

दोन प्रकरणात उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर हेही सामील असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्याकडे ही मागणी करण्यात आली असून या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी मोहिते यांनी सोमवारी (ता 15) बोलावले असल्याची माहिती सातव यांनी दिली. 

- बारावीच्या विद्यार्थ्यांनो, फार्मसी क्षेत्रात उत्तम रोजगाराच्या संधी कोणत्या आहेत, हे तुम्हाला माहित आहे का?

दरम्यान सातव यांनी नऊ विविध प्रकरणांचा उल्लेख पत्रामध्ये केलेला असून प्रत्येक आरोपासंदर्भात आपल्याकडे विविध कागदपत्रे आहेत. आणि ती आपण मोहिते यांना सादर करु, असे त्यांनी नमूद केले आहे. यातील काही प्रकरणात औदुंबर पाटील यांच्यासह पद्मराज गंपले, सचिन शिंदे, शेलार, पोलिस कर्मचारी पोपट नाळे यांची गैरप्रकारांबाबत चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांची बदली करावी, असे या निवेदनात नमूद केले आहे. 

- जगप्रसिद्ध लोणार झालाय गुलाबी; हे आहे त्यामागचे कारण...

वरिष्ठ अधिका-यांकडे म्हणणे सादर करु...
या संदर्भात औदुंबर पाटील यांनी प्रतिक्रीया देण्यास नकार दिला. मला वरिष्ठांकडून चौकशीसाठी बोलावण्यात आल्यास त्यांच्यापुढेच म्हणणे मांडू असे ते म्हणाले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा