काँग्रेसने माझ्या खांद्यावर उपरणे टाकले पण... : प्रवीण गायकवाड

Pravin Gaikwad
Pravin Gaikwad

पुणे : माझ्या खांद्यावर काँग्रेसने फक्त उपरणे टाकले पण स्वीकारले नाही, अशी खंत व्यक्त करत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. 

गायकवाड यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी शेतकरी कामगार पक्ष सोडून काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पक्षाचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश झाला होता. ते पुणे लोकसभा मतदारसंघातून काॅंग्रेसकडून इच्छुक होते. काँग्रेसशी साथ तुम्ही आता सोडली का, या प्रश्नावर त्यांनी सांगितले की मी काॅंग्रेसकडून लोकसभेसाठी इच्छुक असल्याने मुंबईत जाऊन पक्षप्रवेश केला होता. मला तिकिट नाकारले तरी मी लोकसभा निवडणुकीत पक्षाचे आणि  काॅंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे प्रामाणिकपणे काम केले. मात्र काँग्रेसकडून कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. पक्षाच्या नेत्यांनी आमच्याबद्दल आपुलकी तर दाखवली नाहीच; पण आमच्या कार्यकर्त्यांची दखलही घेतली गेली नाही. त्यामुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीसोबत जाण्याची भूमिका मांडली.``

संभाडी ब्रिगेडने येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रिगेडच्या राज्य कार्यकारिणीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com