झेडपीचे आरोग्य समितीचे सभापती प्रवीण मानेंची अपघातग्रस्त युवकाला मदत

राजकुमार थोरात
मंगळवार, 17 एप्रिल 2018

वालचंदनगर (पुणे) : वेळ दुपारी साडेतीनची...लासुर्णे (ता.इंदापूर) येथील चिखलीफाट्याजवळ बारामती- इंदापूर राज्यमार्गावर दुचाकी गाडीचा अपघात होतो. अपघातामध्ये चालक जखमी होतो...रस्त्याने जाणाऱ्या बघ्यांची अपघात पाहण्यासाठी गर्दी जमते...उन्हाच्या तीव्रता व अपघातामुळे जखमीला प्राथमिक उपचारासाठी गरज असताना  झेडपीच्या आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांची गाडी येते. माने स्वत:च्या गाडीतुन जखमीला लासुर्णे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये घेवून जातात व उपचार होईपर्यंत थांबतात.

आज सोमवार(ता.१६) रोजी दुपारी सोडतीन वाजण्याच्या सुमारास लाकडी (ता.इंदापूर ) येथील महेश गोकुळ वनवे (वय २५)  हे दुचाकीवरु बारामती - इंदापूर मुख्य रस्त्याने इंदापूर ला निघाले होते.  लासुर्णे जवळील चिखलीफाटा येथे  वनवे यांच्या दुचाकी मोठी ट्रॉली आडवी आल्यामुळे अपघात होतो. अपघातामध्ये वनवे हे जखमी होतात. अपघातानंतर बघ्यांची गर्दी वाढण्यास सुरवात होते. सगळेजण अपघात कसा झाला याची चौकशी करीत असतात. याचवेळी पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने अपघाताच्या ठिकाणावरुन जात असताना गर्दी पाहुन थांबतात. व तातडीने  जखमी वनवे यांना स्वत:च्या गाडीमध्ये घेवून येऊन लासुर्णे येथील प्राथमिक आरोग्य उपचार होईलपर्यंत थांबतात. सभापती माने यांनी युवकाला तात्काळ केलेल्या मदतीमुळे त्यांचे कौतुक होत आहे.

अपघातील जखमींना तातडीने मदत करा - माने
अपघात छोटा असो अथवा मोठा... अपघातानंतर जखमीला तातडीने प्राथमिक उपचार मिळणे गरजेचे असतात.अनेकठिकाणी भितीपोटी नागरिक अपघातील जखमींना मदत करण्याचे टाळत असतात. अपघातामध्ये मेंदुला इजा झाल्यास एक तासामध्ये उपचार न मिळल्या रुग्ण दगवण्याची शक्यता असल्याने गोल्डन अवर (एक तासामध्ये) जखमींना जवळच्या दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल करण्याचे आवाहन पुणे जिल्हा परिषदचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी केले आहे.
 
Web Title: pravin mane helps injured boy