प्रयत्न फिल्म आणि डान्स फेस्टिव्हल आजपासून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

पुणे - लेखक देवदत्त पटनाईक यांच्या ‘व्हाय डू हिंदू गॉड्‌स डान्स’ या विषयावरील व्याख्यानासह पारंपरिक गीत-संगीत आणि नृत्याचे विविध आविष्कार सादर करणाऱ्या तीन दिवसांच्या ‘प्रयत्न फिल्म आणि डान्स फेस्टिव्हल’ला शुक्रवारपासून (ता. २७) सुरवात होत आहे. हृषीकेश सेंटर फॉर कंटेपररी डान्स, मॅक्‍सम्युलर भवन, गोएथे इन्स्टिट्यूट, पुणे आणि ‘सकाळ’ने कलाकारांच्या विचारप्रक्रियेला चालना देणारा हा महोत्सव रविवारी (ता. २९) साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय नृत्यदिनाच्या निमित्ताने आयोजित केला आहे. 

कंपवाताने (पार्किन्सन) आजारी असलेल्या रुग्णांवरील उपचारांना नृत्याद्वारे मदत करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करणारे नृत्य अभ्यासक हृषीकेश पवार यांच्या पुढाकाराने गेली नऊ वर्षे हा महोत्सव आयोजित केला जातो. या वर्षीच्या फेस्टिव्हलच्या आधी गेल्या शुक्रवारपासून (ता. २०) छायाचित्रण व नृत्यविषयक विविध कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी prayatna.festival@gmail.com या ई-मेलवर किंवा ९८२३७४५५७१ या क्रमांकावर नोंदणी करावी.

कार्यशाळा, सादरीकरण
शुक्रवार, ता. २७
 उद्‌घाटन - हस्ते देवदत्त पटनाईक  व्याख्यान -‘व्हाय डू हिंदू गॉड्‌स डान्स’ स्थळ - नॅशनल फिल्म अर्काईव्हज्‌ ऑफ इंडिया  वेळ - सायंकाळी ६.४५ वा.  (प्रवेश विनामूल्य)

शनिवार, ता. २८
 हृषीकेश पवार यांच्यासह कार्यशाळा   ‘डान्स फॉर पार्किन्सन’  स्थळ ः सकाळ कार्यालय, बुधवार पेठ  वेळ -स. १० ते दु. १  (प्रतिव्यक्ती शुल्क रु. ५००)
भूषण कोरगावकर आणि शकुंतला नगरकर यांच्यासह कार्यशाळा
 ‘एलेमेंट्‌स ऑफ लावणी वर्कशॉप’  स्थळ ः सकाळ कार्यालय, बुधवार पेठ  वेळ - स. १० ते दु. १  (प्रतिव्यक्ती शुल्क रु. ५००)
‘ॲन्ड सो वी डान्स’
 पूर्वजा केळकर आणि वैशाली पाटील निर्मित नृत्य सादरीकर  सहभाग -‘डान्स फॉर पार्किन्सन प्रोग्रॅम’मधील सहभागी  स्थळ - मॉडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर  वेळ - सायंकाळी ६.३० वा.  (प्रवेश विनामूल्य)

रविवार, ता. २९
 संगीत बारी - लावणी परंपरेविषयी विशेष कार्यक्रम  लेखक - भूषण कोरगावकर  स्थळ - मॉडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर  वेळ - सायंकाळी ६.३० वा.  (प्रवेश विनामूल्य)

Web Title: prayatna film dance festival