शिस्तबद्ध पर्यटनासाठी जुन्नर वनविभागाने उचलले मोठे पाऊल

दत्ता म्हसकर
Thursday, 31 December 2020

रॅपलिंग, क्लायबिंग, व्हॅलिक्राॅसिंगसाठी पूर्वपरवानगी आवश्यक

जुन्नर : वनक्षेत्रातील शिस्तबद्द पर्यटनासाठी जुन्नर वनविभागाने पाऊल उचलले असून यापुढे पर्यटक, गिर्यारोहकांना पूर्वपरवानगी शिवाय रॅपलिंग, क्लायबिंग, व्हॅलिक्राॅसिंग करता येणार नसल्याचे उपवनसंरक्षक जयरामे गौडा यांनी स्पष्ट केले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

गौडा यांनी याबाबत वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याच्या पुर्व परवानगी शिवाय कोणत्याही व्यक्ती अथवा व्यक्तीसमूह वनक्षेत्रात रॅपलिंग, व्हॅली क्रॉसिंग, कॅम्पींग करणार नाही याची दक्षता घेण्यास संबंधित वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना कळविले आहे. यापत्रात वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यांनी सर्व वनकर्मचाऱ्यांना याबाबत लेखी सूचना द्यावी असेही कळविले आहे. 

वनक्षेत्रात अस्तित्वात असलेले सर्व मार्ग, कॅम्पींगच्या स्थळांची निश्चिती करावी तसेच गडांवर जाणाऱ्या मार्गांची सूची तयार करून कार्यालयास सादर करण्यास गौडा यांनी कळविले आहे. 
वनविभागाच्या सूचीतील मार्ग तसेच कॅम्पींग स्थळावरुनच पर्यटकांना जाण्याची परवानगी दिली जाईल याची दक्षता घेण्याबाबत या पत्रात कळविले आहे. 

वनक्षेत्रातील जे मार्ग नियमित आहेत जसे नाणेघाट, शिवनेरीवरील साखळदंड व पायरीमार्ग यासाठी मात्र पूर्व परवानगीची आवश्यकता नसल्याचे आदेशात नमूद केले आहे. 
वनक्षेत्रातील नियमित व निश्चित केलेल्या मार्गानेच पर्यटक जातील व येतील याची दक्षता घेण्याच्या अनुषंगाने एन्ट्रीपॉईंटवर संयुक्त वनसंरक्षण समित्यांचे माध्यमातून आवश्यक ती उपाययोजना करुन नियंत्रण ठेवण्याची कार्यवाही वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी करावी असे आदेश दिले आहेत. 
या निर्णयामुळे शिस्तबद्ध पर्यटनास चालना मिळणार आहे. जे पर्यटक या सूचनांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. 

जाणून घ्या केसरचे फायदे; हाडांची मजबूती, कँसरशी लढा आणि उत्तम सेक्स लाईफ देतो केसर  

यापूर्वी गिर्यारोहण संस्था वनविभाग अंतर्गत असलेल्या गावांतील संयुक्त वनव्यवस्थापन समितींच्या बॅंक खात्यात शुल्क जमा करत रॅपलिंग व व्हॅलिक्राॅसिंगसाठी लेखी परवानगीचे पत्र ग्रामपंचायतीकडुन घेत असत. आता गिर्यारोहण संस्थांना याबाबत संयुक्त वनव्यवस्थापन समितीबरोबर व जुन्नर वनविभागास त्यांच्या इव्हेंटबाबत कळविणे बंधनकारक राहणार आहे. तसेच ड्रोन शुटिंगची परवानगी वरिष्ठ कार्यालयाकडून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

यापुढेही रॅपलिंग, क्लायबिंग, व्हॅलिक्राॅसिंग करणेसाठी संबंधित गावची संयुक्त वनव्यवस्थापन समिती, तसेच वनविभागाग, जुन्नर यांची परवानगी  बंधनकारक असल्याचे जुन्नरचे वनपरीक्षेत्र अधिकारी अजित शिंदे यांनी सांगितले.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pre-approval is required for rappelling, climbing, valecrossing