पूर्व पावसाळी स्वच्छता अभियान व बीजारोपण

junnar
junnar

जुन्नर : जुन्नरच्या दुर्गम भागातील दुर्गवाडीच्या देवराईत पावसाळी पूर्व महास्वच्छता अभियान व बीजारोपण उपक्रम रविवारी (ता.18) राबविण्यात आला.

"चला मारू फेरफटका " परिवार व "निसर्ग रम्य जुन्नर तालुका" फेसबुक पेज परीवाराच्या वतीने राबविण्यात आलेल्या उपक्रमात पुणे, पिंपरी-चिंचवड, अहमदनगर, पारनेर, संगमनेर सोलापूर, उस्मानाबाद, बीड, कोल्हापूर, अमरावती, परभणी, कोकण, अकोला, मुंबई, नाशिक येथील चारशे पर्यटक सहभागी झाले होते. 

सहभागी पर्यटकांना जुन्नर तालुक्याचे मार्गदर्शन, स्वच्छता अभियान व वृक्ष  बीजारोपणाची जबाबदारी माजी सैनिक वनरक्षक रमेश खरमाळे यांनी पार पडली. यापूर्वी हा उपक्रम जुन्नर तालुक्यातील किल्ले जीवधन, नाणेघाट,  हडसर, नारायणगड, हटकेश्वर व शिवसृष्टी-जुन्नर येथे   राबविण्यात आला होता. 

निसर्ग भटकंतीत पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची इजा पोहचू नये, उपस्थितांनी पर्यावरण टिकविणे उद्देशाची प्रार्थना करून स्वच्छता मोहीम सुरू केली.

वनरक्षक तेजस्विनी भालेकर यांच्या मार्गदशनाखाली वड, उंबर व जांभळ या वृक्षाची रोपे दुर्गादेवी परीसरात लावण्यात आली.यावेळी सुमारे पाच एकर वनक्षेत्रात विविध प्रजातीच्या बीयांचे रोपण करण्यात आले. या स्वच्छता अभियानात सुमारे 45 गोण्या प्लॅस्टिक गोळा करण्यात आले.यात पाण्याच्या बाटल्या, ग्लास, मद्याच्या बाटल्या भर पावसात गोळा करण्यात आल्या. 

खरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गादेवी व कोकणकडा दर्शन, दुर्गेचा डोंगर, आंबेघाट व आंबे येथील घंटेसारखे वाजणारे दगड याचा भरभरून आनंद घेतला.  

"चला मारू फेर फटका" कोअर कमिटीचे सदस्य  एस. आर. शिंदे यांनी नियोजन केले. यावेळी "चला मारू फेर फटका" परीवारातील राजेश देशमुख, बाळासाहेब चव्हाण, हरिभाऊ दुधाळ, किरण कांबळे, कृष्णा परिट,
सुनील धुमाळ, बळीराम कातांगळे, राजेंद्र माने, योगेश चौधरी, विश्वजीत पवार, नाना नलावडे, उद्धव वाजंळे.शरद गिरवले.चंद्रकांत भोसले,भरत बिडवे. तसेच "निसर्गरम्य जुन्नर तालुका" परिवाराचे विनायक साळुंके, स्वाती खरमाळे हातवीज गावचे ग्रामस्थ रघुनाथ पारधी व सोनावळे गावातील सैराट टिमचे विशाल बोऱ्हाडे आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com