मॉन्सूनपूर्व पावसाने दाणादाण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जून 2018

पुणे - मॉन्सूनपूर्व पावसाने गुरुवारी राज्यात मेघगर्जना, विजा, वादळी वाऱ्यांसह तडाखा दिला. मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली. पहिल्याच पावसाने अनेक ठिकाणी बंधारे भरून, ओढे-नाल्यांना पाणी आले. 

या पावसामुळे खरिपाच्या पेरण्यांनाही वेग येणार आहे. यवतमाळ तालुक्‍यातील ब्रह्मी येथील शिवारात झाडाखाली बसलेल्या मेंढपाळांवर वीज कोसळून तिघे गंभीर जखमी झाले, तर नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाने शेतजमिनींची माती वाहून गेली. हिमायनगर येथे 37 मेंढ्या दगावल्या. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबईसह कोकणात दमदार पाऊस सुरू आहे. 

कोकणातील सिंधुदुर्ग, रात्नागिरी, रायगड जिल्ह्यांत गेले काही दिवस सातत्याने पाऊस पडत असून, गुरुवारी पहाटेपासून मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांतही पावसाच्या सरी बरसू लागल्या आहेत. या पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी तुंबले असून, मध्य रेल्वेची सेवाही कोलमडली. कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी भागात मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यामुळे पेरणीपूर्व तयारीला वेग येणार आहे. सांगली जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. द्राक्ष बाग आणि हळद लागवडीला हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे. 

पुणे जिल्ह्यातील पुरंदर, इंदापूर, दौंड, बारामती, मुळशी तालुक्‍यांमध्ये वादळी वारे, जोरदार पावसाने चारापिके, भाजीपाला, फळबागांचे नुकसान झाले आहे. शेतात काढून ठेवलेला कांदा भिजला आहे. ओढे-नाल्यांना पूर आल्याने बंधारे भरले आहेत. पावसामुळे पाण्याअभावी जळून चाललेल्या पिकांना जीवदान मिळणार आहे. सातारा जिल्ह्यात झालेल्या पावसाने पुसेगाव येथील येरळा नदी दुथडी भरून वाहू लागली. विसापूरमधील ओढ्याला पूर आल्याने सिमेंट बंधारे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. पोषक वातावरणामुळे काही ठिकाणी खरिपाच्या पेरणीस प्रारंभ झाला आहे. 

यातील नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून, नांदेडमध्ये जोरदार पावसाने जमिनीची माती वाहून गेली आहे. यात लागवड केलेले हळद बेणे, सोयाबीन बियाणे वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. हिमायतनगर येथे 37 मेंढ्या दगावल्या. लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत पूर्वमोसमी पावसाने शेती व नाल्यांमधून पाणी वाहिल्याचे चित्र पाहायला मिळाले. बहुतांश भागांत दमदार ते जोरदार बरसलेल्या पूर्वमोसमी पावसामुळे पेरणीपूर्व मशागतीच्या कामांनाच जोर आला आहे. विदर्भातही अनेक ठिकाणी वादळी पाऊस पडला. 

Web Title: Pre-monsoon rain