‘पूर्वमोसमी’च दमदार बरसणार

‘पूर्वमोसमी’च दमदार बरसणार

पुणे - ‘‘दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्रात नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) पोचले नसले तरीही पूर्वमोसमी पाऊस पुढील दोन दिवसांमध्ये दमदार हजेरी लावणार आहे. अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘वायू’ चक्रीवादळामुळे कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पूर्वमोसमी (वळीव) पावसाच्या सरी पडतील,’’ अशी माहिती भारतीय हवामान खात्याचे हवामान तज्ज्ञ डॉ. अनुपम कश्‍यपी यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. 

कोकण किनारपट्टीपासून तीनशे किलोमीटर अंतरावरील ‘वायू’ चक्रीवादळाचे नेमका महाराष्ट्रावर, मॉन्सूनच्या प्रगतीवर काय परिणाम होईल, याबद्दल माहिती देताना डॉ. कश्‍यपी म्हणाले, ‘‘चक्रीवादळाबरोबर आलेल्या बाष्पामुळे कोकण किनारपट्टीवर जोरदार वारे वाहणार असून, तेथे मोठा पाऊस पडणार आहे; पण त्याच वेळी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्येही या चक्रीवादळामुळे आलेल्या बाष्पांमुळे पावसाच्या सरी कोसळणार आहेत.’’

‘‘वायू’ चक्रीवादळामुळे मॉन्सूनची प्रगतीत काही अंशी अडथळा येईल; पण त्यामुळे महाराष्ट्रात शुक्रवारनंतर (१४) मॉन्सूनच्या सरी पडण्यास सुरवात होतील,’’ असेही त्यांनी 
स्पष्ट केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com