प्री-वेडिंग फोटोशुटही अनलॉक; लग्नातील फोटोसेशनची हौस आता पुन्हा होणार पूर्ण

pre-wedding photoshoot starting again after corona lockdown
pre-wedding photoshoot starting again after corona lockdown

पुणे  : "कोरोनामुळे आमच्या लग्नाचा मुहूर्त लांबणीवर पडला. एकाच दिवसात लग्नाचा ट्रेंड सुरू झाल्याने फोटो शुटींगची हौस होईल की नाही, अशी शंका होती. मात्र आता कोरोनाचे संकट काहीसे कमी झाल्याने आम्ही नुकतेच प्री-वेडिंग फोटोशुट केले. त्यामुळे आपण प्रि-वेडिंग फोटोशुट केले नाही, याची सल आता मनात राहणार नाही, असे सांगत भावी वधू श्रुती पाटील यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

श्रुती आणि अक्षय यांचे पुढील आठवड्यात लग्न आहे. गेल्या वर्षी त्यांचा साखरपुडा झाला. मोठ्या थाटामाटात लग्न करायचे म्हणून त्यांनी प्री-वेडिंग ते रिसेप्शनपर्यंतचे फोटो शूट कसे असेल या सर्व गोष्टी ठरविल्या होत्या. मात्र, कोरोनाने त्या सर्वांवर पाणी फिरवले. त्यामुळे किमान लग्नापुर्वीचे फोटोशुट करण्याचा त्यांचा अट्टहास पूर्ण झाला आहे. कोरोनाचे संकट आणि त्याबाबतची शासकीय नियमावली यामुळे एकाच दिवसांत मोजक्‍या माणसांत अनेकांची लग्न उरकली. त्यामुळे त्या जोडप्यांना फोटो सेशन करण्याची हौस काय भागवता आली नाही. मात्र आता कोरोनाच्या परिस्थितीत काहीसा सुधार झाल्याने व प्रशासकीय परवानगीचा अडथळा नसल्याने आवडत्या ठिकाणी प्री-वेडिंग फोटोशुटही पुन्हा सुरू झाले आहे.

या बाबत फोटोग्राफर रिहान तंबोली यांनी सांगितले की, "कोरोनामुळे यंदा लग्नाच्या फोटोशुटच्या ऑर्डरच आल्या नाहीत. सध्या लग्नांचे प्रमाण वाढत आहेत. परंतु, लग्नात येणाऱ्यांच्या संख्येवर निर्बंध असल्यामुळे फोटो शूटच्या बजेटही नागरिकांनी कमी केले आहे. साखरपुडा, प्री-वेडिंग, हळद, लग्न आणि रिसेप्शन असे पूर्ण पॅकेज पूर्वी ठरविले जात होते. आता एकाच दिवशी सर्व कार्यक्रम होत असल्याने बजेट आणि ऑर्डर कमी झाल्या आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून पुन्हा प्री-वेडिंगचा ट्रेंड सुरू झाला आहे. त्यामुळे आता पुन्हा फोटोग्राफी करणा-यांना चांगले दिवस येतील, अशी
आशा आहे.

राज ठाकरे म्हणाले,' तु तुझा प्रचार कर, बाकी मी बघतो'

''लग्नात लोकांची संख्या व त्यासाठी दिला जाणारा वेळ कमी झाला असला तरी सर्व विधी केले जात आहेत. त्यामुळे फोटोशूटच्या पॅकेजमध्ये कपात केल्याने फोटोच्या संख्येत फारसा फरक पडलेला नाही. सध्या आमचे उत्पन्न 60 टक्‍क्‍यांनी कमी झाले आहे. त्यातल्या त्यात आता काही प्रमाणात ऑर्डर यायला सुरवात झाली आहे. गरजेच्या फोटो व्यतिरिक्त प्री-वेडिंग फोटोशुट देखील केले जात आहे ही आमच्यासाठी चांगली बाब आहे.''
- महेश तावरे, फोटोग्राफर

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com