निवडून येण्याची क्षमता असलेल्यांना प्राधान्य - अशोक चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

पुणे - पुणे लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्याची घोषणा माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली होती; परंतु यासंदर्भात राहुल गांधी आणि शरद पवार अंतिम निर्णय घेतील, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यामुळे स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी यांना विचारात घेऊन निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल, असे स्पष्टीकरण कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केले. 

चव्हाण म्हणाले, ""कोणत्याही निवडणुकीत जिंकणारा उमेदवार असावा असे प्रत्येक पक्षाचे मत असते. मतदारसंघातील राजकीय परिस्थिती पाहून त्यानुसार स्थानिक नेत्यांनी चर्चा करून मत व्यक्त केले असेल; परंतु उमेदवारीच्या निर्णयावर अद्याप निर्णय झालेला नाही. पक्षांतर्गत चर्चा करून योग्य त्या वेळी निर्णय घेतला जाईल. सध्या राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षाच्या आघाडीसंदर्भात उच्चस्तरावरून कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. स्थानिक पातळीवरील परिस्थिती विचारात घेऊन स्थानिक नेत्यांना कार्यकर्त्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतला जाईल; परंतु उमेदवार देताना जिंकणारा उमेदवार देण्यावर भर असेल,'' असे सांगत त्यांनी अप्रत्यक्ष संजय काकडे आणि विनायक निम्हण यांच्या कॉंग्रेस पक्षप्रवेशावर भाष्य केले.

Web Title: Preference to those who have the ability to vote says ashok chavan